दुग्ध-व्यवसायात महिलांची गगनभरारी, 48,000 लिटर दुध संकलनातून करतायेत लाखोंची उलाढाल!
शेती, दुग्धव्यवसाय यासारख्या कामात महिलांचा सहभाग वाढत आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिलांचे वाढते योगदान पाहता आता उत्तर प्रदेश सरकारनेही महिलांसाठी चांगले निर्णय घेतले आहेत. सरकारच्या प्रोत्साहानामुळे गोरखपूर विभागात महिलांच्या आत्मनिर्भरतेचे नवे पर्व सुरु केले आहे. दूध व्यवसायाच्या माध्यमातून या भागातील महिलांनी लाखो रुपयांची कमाई केली आहे. श्री बाबा गोरखनाथ कृपा दूध उत्पादक कंपनीच्या माध्यमातून महिला मोठी उलाढाल करत आहेत.
400 गावांतील 14000 हून अधिक महिला सभासद
बुंदेलखंडच्या बालिनी मिल्क प्रोड्युसर कंपनीच्या धर्तीवर या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. मंडळाच्या 400 गावांतील 14,000 हून अधिक पशुपालक महिला श्री बाबा गोरखनाथ कृपा दूध उत्पादक कंपनीमध्ये सभासद (भागधारक) झाल्या आहेत. ही कंपनी दोन वर्षांपूर्वी स्थापन झाली होती. या महिला सदस्यांच्या माध्यमातून दररोज 48 हजार लिटर दूध संकलित करुन स्वावलंबी झाल्या आहेत. येत्या दोन वर्षांत ही महिला दूध उत्पादक कंपनी दररोज तीन लाख लिटर दूध संकलन करू शकणार आहे.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)
वर्षभरात 10 लाखांहून अधिक कमाई
राजकुमारी देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर 2023 मध्ये, उत्तर प्रदेश राज्य ग्रामीण उपजीविका अभियानाद्वारे वित्तपुरवठा केलेल्या श्री बाबा गोरखनाथ कृपा मिल्क प्रोड्यूसर कंपनी लिमिटेडच्या सदस्यांनी राजकुमारीची भेट घेतली. पशुपालनातून मिळणाऱ्या उत्पन्नावर चर्चा केली. पशुपालनात उत्पादित होणारे दूध त्यांच्या गावातूनच खरेदी केले जाईल आणि त्यासाठीचे पैसे त्यांच्या बँक खात्यात पाठवले जातील, असे सांगितले. कुटुंबाच्या संमतीने राजकुमारी या डेअरीच्या सदस्या झाल्या. त्या सध्या 15 गायींच्या दुधाच्या माध्यमातून वर्षभरात 10 लाख 31 हजार रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत.
दररोज 48000 लिटर दुधाचे संकलन
गोरखपूरमध्ये 2022 मध्ये श्री बाबा गोरखनाथ कृपा दूध उत्पादक कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. या कंपनीचे कार्यक्षेत्र विभागातील चार जिल्ह्यात आहे. यामध्ये गोरखपूर, महाराजगंज, देवरिया आणि कुशीनगर यांचा समावेश आहे. या अल्पावधीत या कंपनीत चार जिल्ह्यांतील 400 गावांतील 14 हजारांहून अधिक महिला भागधारक झाल्या आहेत. दररोज 48 हजार लिटर दूध संकलन करत आहेत. या कंपनीकडून दूध शीतकरण केंद्रात गावातील सदस्य महिलांनी गोळा केलेल्या दुधावर प्रक्रिया देखील केली जाते.
वर्षभरात 431 महिला लाखपती
श्री बाबा गोरखनाथ कृपा दूध उत्पादक कंपनीच्या भागधारक बनून महिला स्वावलंबी झाल्या आहेत. दुग्धोत्पादन आणि संकलनात सहभागी होऊन ते उत्पन्न मिळवू शकतात आणि कौटुंबिक उत्पन्न वाढवू शकतात. एका वर्षात कंपनीच्या 431 महिला भागधारक लखपती दीदी झाल्या आहेत. या सर्वांना एक लाखापेक्षा जास्त उत्पन्न मिळाले आहे. एका वर्षात 12 लाख रुपये कमावलेल्या दोन महिला आहेत.