AI ची एंट्री बदलणार म्युझिकचा गेम! YouTube घेऊन आलाय कमाल फीचर, क्षणातच तयार होईल तुमच्या आवडत्या गाण्यांची प्लेलिस्ट
नवीन AI-बेस्ड फीचर गुगलच्या वाढत्या प्रयत्नांचा एक भाग आहे. ज्याअंतर्गत स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म म्यूजिक सर्च अधिक पर्सनलाइज बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे. तसेच गुगल त्यांच्या सर्विसेजमध्ये अधिक AI-बेस्ड टूल्स जोडत आहे. या लाँचमुळे प्रीमियम-खास फीचर्सवर आणि चांगल्या ऐकण्याच्या अनुभवावर यूट्यूब म्युझिकचे वाढते लक्ष केंद्रित होते. युट्यूब म्युझिकचे नवीन AI प्लेलिस्ट फीचर प्रीमियम यूजर्सना त्वरित म्यूजिक प्लेलिस्ट मिक्स बनवण्याची सुविधा देते. सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये कंपनीने सांगितलं आहे की, युट्यूब प्रिमियम आणि युट्यूब म्युझिक प्रिमियमचे यूजर्स आता केवळ कल्पना, मूड किंवा शैलीचे वर्णन करून त्यांच्या स्वतःच्या पर्सनलाइज्ड प्लेलिस्ट तयार करू शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
हे फीचर यूट्यूब म्यूझिक अॅपच्या लाइब्रेरी टॅबमध्ये उपलब्ध असणार आहे. यूजर्सना न्यू बटनवर टॅप करावे लागणार आहे. AI प्लेलिस्ट निवडावी लागणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचे आवडते गाणे व्हॉइस किंवा टेक्स्टद्वारे निवडावे लागेल. गाणं निवडण्याचे पर्याय ‘इंडी पॉप’ किंवा ’90 च्या दशकातील क्लासिक हिट्स’ जसे सामान्य ऑप्शनपासून ‘पार्टीसाठी लाउड म्यूजिक’ किंवा “रात्रींसाठी आरामदायी-शांत संगीत” पर्यंत असू शकतात. अद्याप गुगलने स्पष्ट केले नाही की, प्लेलिस्टवर यूजर्सचा किती कंट्रोल असणार आहे आणि हे टूल किती फ्लेक्सिबल असणार आहे.
कंपनी स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म AI-बेस्ड सर्चवर जास्त लक्ष देत असतानाच नव्या फीचरची घोषणा केली जात आहे. Spotify ने गेल्या महिन्यात अशाच प्रकारचे प्रॉम्प्ट-बेस्ड प्लेलिस्ट फीचर लाँच केले होते आणि अमेझॉन म्युझिक आणि डीझरसारख्या सेवांनी एआय-आधारित प्लेलिस्ट आणि रेडिओ टूल्स देखील जोडल्या आहेत. युट्यूब म्युझिक गेल्या काही काळापासून अशाच प्रकारच्या फीचरची चाचणी करत आहे. अॅपने आधीच आस्क म्युझिक लाँच केले आहे आणि प्रॉम्प्ट-बेस्ड AI रेडियो जनरेशनसह प्रयोग केला होता. मात्र परंतु एआय प्लेलिस्ट आता थेट प्लेलिस्ट निर्मिती प्रक्रियेत एकत्रित केल्या जात आहेत, ज्यामुळे ते रेडिओ-शैलीच्या पर्यायाऐवजी डेडीकेटेड प्लेलिस्ट बिल्डरसारखे वाटते.






