(फोटो सौजन्य: istock)
शरीराच्या स्वच्छेतेसह आपल्या दातांची स्वच्छताही तितकीच गरजेची असते. आपली दात नियमित अथवा योग्यरित्या घासले नाहीत तर त्यावर पिवळा थर साचू लागतो जो चार-चौघात आपली इज्जतही घालवू शकतो. दात पिवळे होणे ही अशी समस्या आहे की ती टाळण्यासाठी तुम्ही कितीही दात घासले तरी दातांचा पिवळापणा कमी होत नाही. अनेकदा यामुळे आपल्या तोंडातून दुर्गंध वासही येतो आणि यामुळे दातांना कीड लागून ते दात कमकुवत होण्याची शक्यता असते. आम्ही तुम्हाला सांगतो की, दातांच्या या समस्या तुम्ही घरगुती उपायांनी दूर करू शकता आणि तेही कमी पैशात! दातांच्या स्वछतेसाठी बाजारात अनेक प्रोडक्टस उपलब्ध आहेत मात्र या प्रोडक्टसची किंमत बऱ्याचदा आपल्या आवाक्याबाहेरची असते अशात तुम्ही घरगुती उपायाने घरीच दातांच्या सर्व समस्यांना दूर पळवू शकता.
आयुर्वेदिक डॉक्टर उपेंद्र बहादूर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी आजीच्या काळातील एक रेसिपी सांगितली आहे, ज्यामुळे दात हिऱ्यासारखे चमकतील. या उपायाच्या मदतीने तोंडातील दुर्गंधीसह अनेक समस्या दूर होतील. चला हा घरगुती उपाय काय आहे आणि याचा कसा वापर करायचा ते जाणून घेऊया.
साहित्य
कसा करावा उपाय?
कसे वापरायचे?
हे पाणी किमान ३ दिवस झाकून ठेवा आणि मग दातांवर याचा वापर करा. तीन दिवसांनी रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला या पाण्याने गुळण्या करायच्या आहेत. . याशिवाय, चांगल्या परिणामांसाठी तुम्ही या पाण्याने ब्रश देखील करू शकता. यामुळे दातदुखी , तोंडाची दुर्गंधी, दातांची पोकळी आणि पिवळेपणा देखील दूर होईल.
महिलांच्या सर्व आजारांवर गुणकारी उपाय जवसाची चटणी! हाडांच्या वेदना, बद्धकोष्ठता होईल कमी
तुरटीची दातांना होणारे फायदे
तुरटीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे तोंडात हानिकारक बॅक्टेरिया वाढू देत नाहीत. अशा परिस्थितीत दात किडणे आणि हिरड्यांच्या समस्या टाळता येतात. तुरटीचे इतर गुणधर्म दात मजबूत करतात आणि पिवळेपणा कमी करण्यास देखील मदत करतात.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.