HIV in Maharashtra केंद्रातील NACOकडून मानाचा पुरस्कार; HIV बाधितांची काळजी घेण्यात महाराष्ट्र अव्वल
राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेच्या काळजी आधार आणि उपचार विभागाच्या प्रमुख डॉ. चिन्मयी दास यांच्या हस्ते तो महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेचे प्रतिनिधी, काळजी आधार आणि उपचार विभागाच्या उपसंचालक डॉ. प्रियांका वाघेला आणि सहायक संचालक प्रदीप सोनवणे यांना प्रदान करण्यात आला. नाकोच्या कामगिरी निर्देशांकानुसार ‘ग्रीन झोन’मध्ये सर्वाधिक अँटी रेट्रोव्हायरल उपचार केंद्रे असल्यामुळे महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेने आपले अव्वल स्थान मिळविले आहे.
हा सन्मान एचआयव्हीसह जगणाऱ्यासाठी अँटी रेट्रोव्हायरल थेरपी उपचार सेवा पुरवण्यात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीला अधोरेखित करतो. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक यांच्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झाले. राज्य एड्स नियंत्रण संस्थेचे प्रकल्प संचालक सुनील भोकरे, अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. विजय कंदेवाड आणि डॉ. भवानी मुरुगेसन यांनी सांगितले, हा पुरस्कार एचआयव्हीसह जगणाऱ्यांसाठी विनामूल्य आधार पुरवण्याच्या राज्याच्या कटिबद्धता अधोरेखित करतो.
सप्टेंबर २०२५ च्या अंतिम गुणपत्रिकेत ७५ हुन अधिक गुण मिळवलेल्या ‘ग्रीन झोन मधील १६ केंद्रांपैकी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड, एएफएमसी पुणे, उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर, डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर आणि ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय धाराशिव या सर्वोत्कृष्ट ५ एआरटी केंद्रांचा सत्कार करण्यात आला.
राज्यातील या केंद्रांनी एचआयव्ही बाधित व्यक्तींना व्यापक उपचार, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि प्रभावी सहाय्य उपलब्ध करून देताना उल्लेखनीय कामगिरी केली. सप्टेंबर 2025 मध्ये प्रसिद्ध झालेल्या अंतिम गुणपत्रिकेत 75 पेक्षा अधिक गुण मिळवून ‘ग्रीन झोन’मध्ये 16 केंद्रांचा समावेश झाला होता, त्यापैकी पाच ART केंद्रांनी सर्वोत्तम कामगिरी दाखवली.
Mumbai: गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात पंकजा मुंडे यांच्या पीएला अटक; अनंत गर्जेनी जरी केले निवेदन
ग्रीन झोनमधील शीर्ष पाच ART केंद्रे:
याशिवाय, खाजगी वैद्यकीय संस्थांनीही उत्कृष्ट कामगिरी नोंदवली.
या दोन खाजगी ART केंद्रांनाही ‘ग्रीन झोन’मध्ये सातत्याने राहिल्याबद्दल विशेष मान्यता देण्यात आली.






