वजन वाढविण्यासाठी कोणत्या पदार्थांचा समावेश करावा
अनेकांचे शरीर सुकून अगदी सांगाड्यासारखे होते आणि त्यामुळे त्यांना कधी-कधी लाजिरवाणेपणाला सामोरे जावे लागते. शरीर कमकुवत असेल तर लोकांच्या व्यक्तिमत्त्वावरही वाईट परिणाम होतो. आपले सांगाड्यासारखे शरीर ताजेतवाने करण्यासाठी आणि वजन वाढवण्यासाठी लोक अनेक पद्धतींचा अवलंब करतात. कोणी जिम जॉईन करतात तर बरेच लोक प्रोटीनचे मोठे कॅन विकत घेतात आणि वजन वाढवण्यासाठी वापरतात. तथापि, जर तुम्ही तुमच्या आहारात बाजारात उपलब्ध असलेल्या सप्लिमेंट्सऐवजी काही आरोग्यदायी पदार्थांचा समावेश केला तर तुम्हाला आश्चर्यकारक परिणाम मिळू शकतात.
हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार, वजन वाढवण्यासाठी योग्य आहाराचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला निरोगी मार्गाने वजन वाढवायचे असेल तर तुम्ही उच्च कॅलरी, उच्च प्रथिने आणि निरोगी चरबीयुक्त पदार्थांचे सेवन केले पाहिजे. या प्रकारच्या आहारामुळे तुमचे स्नायू मजबूत होण्यास मदत होईल आणि शरीराला अधिक ऊर्जा मिळेल. या पदार्थांचे सेवन केल्याने तुमचे वजन तर वाढेलच पण शरीरात आंतरिक शक्तीही येईल. तथापि, वजन वाढवण्यासाठी जंक फूड किंवा फास्ट फूड खाऊ नये, कारण यामुळे वजन तर वाढेलच पण आजारांचा धोकाही वाढेल (फोटो सौजन्य – iStock)
अक्रोडचे नियमित सेवन
नाश्त्यात करा अक्रोडचा वापर
अक्रोडमध्ये प्रथिने, निरोगी चरबी आणि फायबर भरपूर असतात. अक्रोड खाल्ल्याने शरीराच्या स्नायूंची वाढ होऊ शकते आणि त्यामुळे निरोगी मार्गाने वजन वाढवणे सोपे होते. तुम्ही ते स्नॅक म्हणूनही खाऊ शकता किंवा रोज रात्री अक्रोड पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी उठून अक्रोडचे सेवन करावे. हे नित्यनियमाने केल्यास तुम्हाला नक्कीच वजनामध्ये फरक होत असलेला दिसून येईल
दूध पिणे करा सुरू
रोज नियमितपणे दुधाचे सेवन करावे
शरीराचे वजन वाढवायचे असेल तर दूध पिणे सुरू करा. दूध प्रथिने, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी चा चांगला स्रोत आहे. हे शरीराला शक्ती प्रदान करते आणि स्नायू तयार करण्यास मदत करते. दूध प्यायल्याने शरीर मजबूत होते. दुधात कॅल्शियमच्या प्रमाणासह अनेक पोषक तत्व असतात. रात्री नियमितपणे तुम्ही 1 ग्लास दूध प्यायला हवे. यासह तुम्ही बदाम, काजू पावडरदेखील मिक्स करू शकता
वजन कमी करण्यासाठी ‘हा’ पदार्थ ठरेल आयुर्वेदातील रामबाण उपाय, झपाट्याने होईल वजन कमी
केळ्याचा करा उपयोग
केळ्याचे सेवन करणे ठरेल अधिक फायदेशीर
वजन वाढवण्यासाठी भरपूर केळी खा. केळी तुम्ही दुधासोबतही खाऊ शकता. केळ्यामध्ये भरपूर कॅलरी आणि कार्बोहायड्रेट्स असतात. हे शरीराला झटपट ऊर्जा पुरवते आणि वजन वाढवण्यासाठी उत्तम फळ आहे. नाश्त्यातही केळी खाऊ शकता. ज्यांचे वजन अगदीच कमी आहे त्यांनी नियमित केळी खावी. दुधात केळं मिक्स करून खाल्ल्याने लवकर वजन वाढू शकते
अंड्यांचा करा वापर
अंडी खाणे ठरेल लाभदायक
अंडी खाल्ल्याने शरीराचे वजन झपाट्याने वाढते. अंडी हा प्रथिने आणि निरोगी चरबीचा चांगला स्रोत आहे. यामध्ये चांगल्या दर्जाचे प्रोटीन असते, जे स्नायूंच्या विकासासाठी उपयुक्त ठरते. वजन वाढवण्यासाठी तुम्ही अंड्याचे सेवन करू शकता. अंड्याचा बलक असो वा उकडलेली अंडी असतील तर तुम्ही रोजच्या नाश्त्यात याचा समावेश करून घ्या
वजन वाढविण्याचा ‘जादुई फॉर्म्युला’, तुपासह खा 4 पदार्थ; आठवड्यात चढेल अंगावर मणभर मांस
पीनट बटर
पीनट बटर खाण्याने वाढेल वजन
पीनट बटरमध्ये प्रथिने, चरबी आणि कॅलरीज चांगल्या प्रमाणात असतात, ज्यामुळे वजन वाढण्यास मदत होते. याशिवाय पालक, मटार आणि इतर हिरव्या पालेभाज्यांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. हे शरीराचे पोषण करते आणि स्नायू तयार करण्यास मदत करते
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.