कॅन्सरच्या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष
कर्करोग हा कोणत्याही विशिष्ट वयात हल्ला करणारा आजार नाही, तर तो कोणत्याही वयात कोणालाही होऊ शकतो. आता लहान मुले आणि प्रौढांमध्येही अनेक प्रकारचे कर्करोग दिसून येत आहेत. मात्र, या गंभीर आजारापासून बचाव करणे अशक्य आहे असं अजिबात नाही. जीवनशैलीत आवश्यक बदल करून आणि खाण्याच्या सवयींकडे लक्ष दिल्यास कर्करोगाचा धोका बऱ्याच अंशी कमी करता येतो. प्रतिबंध करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे त्याची लक्षणे वेळेत ओळखणे होय.
न्यूबर्ग सेंटर फॉर जीनोमिक सेंटरच्या मॉलेक्युलर ऑन्कोपॅथॉलॉजिस्ट डॉ. किंजल पटेल यांनी महत्त्वाची माहिती देत सांगितले की, हा आजार सुरू होताच आपले शरीर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे सिग्नल देऊ लागते, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका, तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. आज आपण कॅन्सरची अशीच काही लक्षणे आणि त्यापासून बचाव करण्याविषयी जाणून घेणार आहोत. (फोटो सौजन्य – iStock)
त्वरीत वजन कमी होणे
वजन कमी होऊ लागल्यास लक्ष द्या
हे सर्वात सामान्य लक्षण आहे, जे कर्करोगाव्यतिरिक्त इतर अनेक आजारांदरम्यान दिसून येते. तुमचे मूल नीट खात नसेल आणि कोणतीही शारीरिक हालचाल व्यवस्थित करत नसतानाही वजन झपाट्याने कमी होत असेल, तर ही चिंतेची बाब आहे.
प्रतिबंध
हेदेखील वाचा – 40 नंतर पुरुषांना स्वतःकडे लक्ष देणे गरजेचे, 5 प्रकारच्या कॅन्सरचा वाढतोय धोका
सतत थकवा आणि अशक्तपणा
सतत थकवा जाणवत असल्यास
शारीरिक हालचालींदरम्यान थकवा जाणवणे सामान्य आहे, परंतु कोणत्याही कारणाशिवाय थकवा किंवा अशक्तपणा जाणवतो आणि जो विश्रांतीनंतरही दूर होत नाही. असे असल्यास हे कर्करोगाचे लक्षण असू शकते.
प्रतिबंध
वारंवार संक्रमण
जर तुमचे मूल वारंवार एखाद्या संसर्गाला बळी पडत असेल, तर ते त्याच्या कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे असू शकते, जे ल्युकेमिया किंवा इतर कर्करोगाचे लक्षण असू शकते. वारंवार येणारा ताप, संसर्ग आणि अस्पष्ट जखम किंवा रक्तस्त्राव याकडे दुर्लक्ष करू नका.
प्रतिबंध
हेदेखील वाचा – ब्लड कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे,वेळीच व्हा सावध
गुठळ्या किंवा सूज
गुठळ्या किंवा अचानक सूज येत असल्यास
मान, काख, पोट किंवा कंबरेभोवती कोणत्याही कारणाशिवाय ढेकूळ येणे वा गुठळ्या होणे किंवा सूज जाणवत असेल तर हेदेखील कर्करोगाचे लक्षण असू शकते. या गुठळ्या अनेकदा वेदनारहित असतात आणि कालांतराने वाढू शकतात.
प्रतिबंध
सतत वेदना
असह्य वेदना
हाडे किंवा सांधे सतत दुखणे हे ऑस्टिओसारकोमा सारख्या कर्करोगाचे प्रारंभिक लक्षण असू शकते. जर एखाद्या मुलाने सतत वेदना होत असल्याची तक्रार केली जी सामान्य उपचारांना प्रतिसाद देत नाही, तर त्याची अधिक चौकशी केली पाहिजे.
प्रतिबंध
त्वचेत बदल
त्वचेत होणारे बदल जाणवल्यास
त्वचेचे बदल होणे अर्थात नवीन तीळ येणे किंवा असामान्य पुरळ येणे हे त्वचेचा कर्करोग किंवा इतर कर्करोगाची चिन्हे असू शकतात. चामखीळाच्या आकारात किंवा रंगात काही बदल झाल्यास डॉक्टरांना भेटण्यास उशीर करू नका.
प्रतिबंध
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.