हृदयाचे आरोग्य खराब झाल्यानंतर शरीरात दिसू लागतात 'ही' भयानक लक्षणे,
बदललेल्या जीवनशैलीमुळे हल्ली कोणत्याही वयात हृद्यासंबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. हल्ली हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण वाढेल आहे. हार्ट अटॅक आल्यानंतर शरीराला हानी पोहचून बऱ्याचदा मृत्यू सुद्धा होतो. त्यामुळे हार्ट अटॅक काही दिवस आधी शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करावे. यामुळे हार्ट अटॅक सारख्या गंभीर आजाराचा धोका टाळता येईल. आहारात सतत होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन, कामाचा वाढलेला तणाव, अपुरी झोप, सतत तिखट किंवा मसालेदार पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य – iStock)
बऱ्याचदा शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र हार्ट अटॅक येण्याच्या काही दिवस आधीपासूनच शरीरात अनेक गंभीर दिसून येतात. श्वासोच्छवास, त्वचेचा रंग, चालण्याची ताकद किंवा सतत थकवा, अशक्तपणा जाणवणे इत्यादी आरोग्यासंबंधित गंभीर लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हृदयाचे आरोग्य खराब झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसू लागतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. शरीरात दिसून येणाऱ्या या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता आरोग्याची योग्य काळजी घ्यावी.
शरीरात वाढलेल्या कोलेस्टरॉलमुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन जातात. या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर हृदयाकडे व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा न झाल्यामुळे किंवा रक्तप्रवाहात अडथळे निर्माण झाल्यामुळे हार्ट अटॅक येण्याची जास्त शक्यता असते. याशिवाय १० किंवा १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ चालल्यानंतर लगेच दम लागणे किंवा धाप लागणे इत्यादी समस्या उद्भवू लागतात. मात्र चालताना जर तुमच्या छातीमध्ये जडपणा जाणवतं नसेल तर तुमचे हृदय निरोगी आहे, असे समजले जाते.
हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येण्याचे मुख्य कारण म्हणजे शरीराचा रक्तदाब वाढणे. शरीराचा रक्तदाब सामान्यपणे 120/80 च्या आसपास असेल आणि हृदयाचे ठोके 60–100 असेल तर तुमच्या हृदयाचे कार्य व्यवस्थित चालू आहे. पण तुमचा रक्तदाब १२० पेक्षा जास्त वाढल्यास शरीरात अनेक भयानक बदल होण्याची जास्त शक्यता असते. यामुळे बऱ्याचदा हृदयाच्या रक्तवाहिन्यांना इजा होण्याची जास्त शक्यता असते.
मानवी शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल आढळून येते. चान्गले कोलेस्ट्रॉल आणि वाईट कोलेस्ट्रॉल. शरीरात वाढलेले चांगले कोलेस्ट्रॉल शरीरात निरोगी पेशी तयार करतो, तर वाईट कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर हृदयाच्या रक्तवाहिन्यांना इजा होऊन हार्ट ब्लॉकेजची समस्या उद्भवण्याची शक्यता असते. शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल, बदाम, बिया आणि फॅटी मासे इत्यादी पदार्थांचे सेवन करावे.