मासिक पाळी येण्याआधी सतत व्हाईट डिस्चार्ज होतो? निरोगी आरोग्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन
वयाच्या प्रत्येक टप्प्यात महिलांच्या शरीरात सतत काहींना काही बदल होतात. मासिक पाळी, गर्भधारणा, मोनोपॉज इत्यादी अनेक बदलांना महिलांना सामोरे जावे लागते. मासिक पाळी येण्याआधी आणि मासिक पाळी आल्यानंतर महिलांच्या शरीराचे सतत बदल होतात. याशिवाय महिलांमध्ये प्रामुख्याने दिसून येणारी समस्या म्हणजे व्हाईट डिस्चार्ज होणे. व्हाईट डिस्चार्ज होणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. शरीरात होणाऱ्या बदलांमुळे आणि हार्मोन्सचे असंतुलन झाल्यामुळे व्हाईट डिस्चार्जचे प्रमाण सतत कमी जास्त होत असते. हार्मोनल असंतुलन, अस्वच्छता, संसर्ग किंवा शरीरात निर्माण झालेली पोषकतत्वांची कमतरता निर्माण झाल्यनंतर अंगावर सफेद पाणी जाऊ लागते. बऱ्याच महिला ही समस्या सामान्य समजून दुर्लक्ष करतात. मात्र असे केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. (फोटो सौजन्य – iStock)
अंगावरून सतत पांढरे पाणी जाऊन लागल्यामुळे शरीरात बऱ्याचदा सतत थकवा, अशक्तपणा वाढू लागतो. याशिवाय काहीवेळा शरीरातील कॅल्शियम आणि इतर पोषक घटकांची पातळी कमी होऊन जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अंगावर वारंवार पांढरे पाणी जात असल्यास आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.
केळी खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. केळ्यांमध्ये असलेले गुणधर्म शरीरासाठी अतिशय महत्वाचे आहेत. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी केळी खावीत. याशिवाय केळ्यांचे सेवन केल्यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित एक किंवा दोन केळी केल्यास अंगावर जात असलेल्या पांढऱ्या पाण्याची समस्या कमी होईल. याशिवाय अनावश्यक स्राव कमी होईल.
शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात नियमित एक आवळा किंवा आवळ्याच्या रसाचे सेवन करावे. आवळ्यामध्ये असलेले गुणकारी घटक शरीरासाठी अतिशय महत्वाचे ठरतात. यामध्ये विटामिन सी, फायबर इत्यादी अनेक घटक आढळून येतात. आवळ्याच्या रसाचे सेवन केल्यामुळे शरीराचे रक्तशुद्ध होते. नियमित आवळा खाल्यामुळे संसर्गजन्य व्हाईट डिस्चार्ज कमी होईल.
मेथी दाण्यांचे सेवन केल्यामुळे शरीराचे हार्मोन्स संतुलित राहतात. याशिवाय शरीरात वाढलेले व्हाईट डिस्चार्जचे प्रमाण नियंत्रणात राहते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. एक ग्लास पाण्यात मेथी दाणे भिजत घालून सकाळी उपाशी पोटी पाण्याचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतात. शरीरात वाढलेला अशक्तपणा दूर होतो.