लिव्हर सडल्यानंतर मानेवर दिसून येतात 'ही' महाभयंकर लक्षणे
दीर्घकाळ निरोगी आरोग्यासाठी पौष्टिक आहार, शरीरास आवश्यक असलेली पुरेशी झोप, शारीरिक हालचाली, भरपूर पाण्याचे सेवन इत्यादी अनेक गोष्टी योग्यरित्या फॉलो करणे आवश्यक असते. पण हल्ली बदलेल्या जीवनशैलीमुळे शरीरात अनेक बदल दिसून येतात. शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. शरीरातील अतिशय महत्वाचा अवयव म्हणजे लिव्हर. लिव्हरच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर शरीरात विषारी घटक तसेच साचून राहतात. लिव्हर अन्नपदार्थ पचवणे, विषारी पदार्थ बाहेर काढून टाकणे, शरीर कायमच स्वच्छ ठेवणे इत्यादी महत्वपूर्ण कामे करते. पण लिव्हरच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर हळूहळू लिव्हरमध्ये हानिकारक पेशी वाढू लागतात. फॅटी लिव्हर, हिपॅटायटीस बी किंवा मद्यपान इत्यादी गोष्टींमुळे लिव्हर आतून पूर्णपणे सडून जाते.(फोटो सौजन्य – istock)
पहाटेच्या वेळी अनेकांना हृदयविकाराचा झटका का येतात? जाणून घ्या यामागील सविस्तर कारण
लिव्हरसबंधित आजार झाल्यानंतर शरीरात सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येतात. त्यामुळे हळूहळू शरीराचे वजन कमी होणे, लिव्हरला सूज येणे किंवा पोटात दुखणे इत्यादी अनेक लक्षणे शरीरात दिसून येतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लिव्हर खराब झालेल्या मानेवर कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहेत. ही लक्षणे दिसताच तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करून आरोग्याची काळजी घ्यावी.
लिव्हर आतून खराब झाल्यानंतर मानेवर काळे डाग येऊन मानेला सूज येण्याची शक्यता असते. मानेवरील त्वचा तपकिरी किंवा काळी दिसून जाड वाटू लागते. ही लक्षणे फॅटी लिव्हर किंवा इन्सुलिन रेझिस्टन्स झाल्यानंतर शरीरात दिसून येतात. याशिवाय लठ्ठपणा, मधुमेह किंवा पीसीओडीच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांना लिव्हरसबंधित समस्या उद्भवतात.
मानेवर खाज आल्यानंतर बऱ्याचदा त्वचा संसर्ग किंवा इन्फेक्शन समजून दुर्लक्ष केले जाते. पण लिव्हरच्या पित्तनलिका ब्लॉक झाल्यानंतर शरीरात पित्त क्षार जमा होऊ लागते. यामुळे संपूर्ण शरीराला खाज येते. मान, पाठ आणि हात आणि पायांमध्ये खाज येऊ लागल्यास दुर्लक्ष न करता उपचार करावे.
लिव्हरच्या आरोग्यासाठी दैनंदिन आहारात खाल्ले जाणारे पदार्थ अतिशय घातक ठरतात. सतत धूम्रपान, सिगारेट, कोल्ड्रिंक किंवा इतर हानिकारक पेयांचे सेवन केल्यामुळे लिव्हर खराब होऊ लागते. तसेच लिव्हरमध्ये अनावश्यक पेशी वाढू लागल्यास खाल्ले अन्नपदार्थ पचन होण्यास सुद्धा अडथळे निर्माण होतात.
यकृताला होणारे आजार?
यकृतामध्ये चरबी जमा झाल्यास हा आजार होतो. यकृतामध्ये कर्करोगाच्या पेशींची वाढ होणे. विषाणूमुळे (viral) होणारा संसर्ग, ज्यामुळे यकृताला सूज येते.
यकृताची काळजी कशी घ्यावी?
नियमित आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे, दारूचे सेवन टाळणे किंवा कमी करणे, संतुलित आणि पौष्टिक आहार घेणे, and वजन नियंत्रणात ठेवणे.
यकृताच्या आजारांची लक्षणे?
त्वचा आणि डोळ्यांचा पिवळेपणा, पोटदुखी आणि सूज, पाय आणि घोट्यात सूज, खोकला आणि थकवा, त्वचेला खाज सुटणे, मूत्र गडद रंगाचे आणि मल फिकट रंगाचे येणे.






