(फोटो सौजन्य: istock)
बदलत्या काळात मानव प्रगत होत असला, नवनवीन तंत्रज्ञान जन्माला येत असले तरी मानवाची प्रकृती मात्र दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. बदलते वातावरण, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि व्यायामाकडे दुर्लक्ष या सर्वांमुळेच आपले आरोग्य खराब होत चालले आहे त्यामुळे जवळजवळ प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रस्त आहे. अनेकदा हे आजार सुरुवातीला लहान असतात पण याकडे दुर्लक्ष केल्याने आणि वेळेत उपचार न घेतल्यामुळे ते मोठे होत जातात आणि मग ऐनवेळी उपचार घेऊनही माणसाचा जीव वाचला जात नाही.
कोणताही आजार होण्याआधी आपल्याला आपले शरीर त्यासंबधीत काही संकेत देत असतो जे वेळीच ओळ्खल्यास आपण त्या आजारांना वेळीच दूर पळवू शकतो आणि स्वतःला सुरक्षित बनवू शकतो. चुकीच्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराचा धोका फार वाढला आहे अशात आम्ही तुम्हाला सांगतो की, शरीरावर दिसून येणारी काही लक्षणे तुम्हाला यासंबंधित काही संकेत देत असतात ज्यांना ओळखून तुम्ही तुमचे हृदय निरोगी बनवू शकता. चला ही लक्षणे कोणती आहेत याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.
त्वचा निळी पडणे
जर तुमची त्वचा वारंवार निळी होत असेल तर ते हृदयरोगाचे लक्षण असू शकते. याला सायनोसिस असेही म्हणतात. हा रंग रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे येतो, ज्यामुळे त्वचेखालील रक्तवाहिन्यांमधील रक्त निळे दिसू लागते. जेव्हा हृदय आजारी असते तेव्हा सहसा ओठ, बोटे किंवा पाय निळे पडण्याची लक्षणे दिसू लागतात.
डोळ्याभोवती पिवळे डाग पडणे
बहुतेकदा जेव्हा आपले हृदय खराब होत असते तेव्हा आपल्या डोळ्यांभोवती अथवा पापण्यांवर पिवळे डाग दिसू लागतात. हे दर्शवते की, तुमच्या रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढली आहे. तुमच्यासोबतही असे काही होत असेल तर वेळीच हॉस्पिटल गाठा आणि यावर डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्या.
पायांना सूज येते
सामान्य वाटतं असलेले हे लक्षण तुम्हाला तुमच्या हृदयाचे आरोग्य दर्शवत असते. जर दय रक्त योग्यरित्या पंप करू शकत नसेल तेव्हा आपल्या पायांत अथवा घोट्यांमध्ये सूज येण्याची समस्या जाणवू लागते. सतत ही समस्या जाणवत असेल तर यावर वेळीच इलाज करणे गरजेचे आहे.
चेहऱ्यावर घाम येणे
घाम येणे ही एक सामान्य गोष्ट आहे पण उष्णता ना जाणवताही सतत जर चेहऱ्यावर घाम येत असेल तर हे हृदयरोगाचे लक्षण असू शकते. जेव्हा आपले हृदय कमकुवत होऊ लागते, जेव्हा त्याला आवश्यकतेपेक्षा जास्त काम करावे लागते तेव्हा चेहऱ्यावर घाम येऊ लागते. यासहच चेहऱ्यावर लहान मुरुमे येणे हे देखील हृदयरोगाचे लक्षण असू शकते.
हृदयरोगाची लक्षणे कोणती?
छातीत दुखणे किंवा अस्वस्थता, श्वास घेण्यास त्रास होणे, हृदयाची धडधड वाढणे आणि महिलांमध्ये थकवा, अपचन आणि जबडा किंवा पाठीच्या वरच्या भागात वेदना ही लक्षणे असू शकतात.
हृदयरोगासाठी कोणते जोखीम घटक आहेत?
उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल, मधुमेह, लठ्ठपणा, धूम्रपान, शारीरिक निष्क्रियता आणि कौटुंबिक इतिहास हे जोखीम घटक आहेत.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.