तांदळाचे पाणी लावल्याने त्वचेला होणारे फायदे
जगभरात कोरियन आणि जपानी महिलांच्या त्वचेचे फार कौतुक केले जाते. वय वाढल्यानंतर सुद्धा महिला तरुण दिसतात. यामागे नेमकं काय रहस्य आहे जाणून घेऊया. कोरियन महिला मागील अनेक वर्षांपासून त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचा वापर करत आल्या आहेत. अजूनही या महिला तांदळाच्या पाण्याचा वापर त्वचेसाठी करतात. तज्ज्ञांच्या मते, तांदळाच्या पाण्याचा वापर त्वचा आणि केसांच्या आरोग्यसाठी अतिशय गुणकारी आहे. तांदळाच्या पाण्यामध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन बी, आणि अनेक पोषक घटक आढळून येतात, ज्यामुळे तुमची त्वचा ताजी आणि चमकदार दिसते. तसेच तांदळाच्या पाण्यात असलेले गुणधर्म त्वचेवरील डाग काढून टाकण्यासाठी मदत करतात.
तांदळाच्या पाण्याचा वापर त्वचेसाठी केल्यामुळे त्वचेचा रंग उजळतो, चेहऱ्यावर चमक वाढते, तसेच केसांचे आरोग्य सुधारून केसांची वाढ होण्यास मदत होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोरियन पद्धतीने तांदळाचे पाणी कसे बनवायचे, यामुळे त्वचेला नेमके काय फायदे होतात, तांदळाच्या पाण्याचा वापर कसा करावा, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: कितीही खाल्लं तरीसुद्धा केसांची वाढ होत नाही? मग नियमित प्या ‘हे’ पेय,तब्येतीला होतील फायदे
तांदळाचे पाणी लावल्याने त्वचेला होणारे फायदे
कोरियन पद्धतीने तांदळाचे पाणी बनवण्यासाठी एका वाटीमध्ये तांदूळ घेऊन ते स्वच्छ धुवून घ्या. दोन ते तीन वेळा तांदूळ व्यवस्थित धुवून झाल्यानंतर अर्धा तास तांदूळ पाण्यात भिजत ठेवा. तांदूळ भिजल्यानंतर त्यात तांदूळ काढून घ्या. यामुळे तांदळातील सर्व गुणधर्म पाण्यात उतरतील. त्यानंतर तयार केलेले पाणी चेहऱ्याला लावा. उरलेली पाणी तुम्ही फ्रिजमध्ये साठवू शकता.
तांदळाचे पाणी लावल्याने त्वचेला होणारे फायदे
तांदळाचे पाणी त्वचेला लावल्यामुळे चेहरा रंग उजळण्यास मदत होते. तसेच त्वचेला पोत सुधारून खराब झालेली त्वचा सुधारण्यास मदत होते. तांदळाचे पाणी चेहऱ्याला लावल्यामुळे उन्हामुळे काळा पडलेला चेहरा हळूहळू उजळू लागतो.चेहऱ्यासोबतच केसांच्या वाढीसाठी सुद्धा तांदळाचे पाणी फायदेशीर आहे. केसांच्या मुळांना तांदळाचे पाणी लावल्यामुळे केसांची मूळ मजबूत होऊन केसांची वाढ होते. रोजच्या वापरतील मेकअप प्रॉडक्टमध्ये तांदळाच्या पाण्याचा टोनर म्हणून वापर करा.
हे देखील वाचा: धुतलेल्या तांदळाचे पाणी फेकून देण्यापेक्षा बनवा कोरियन आईस क्युब्स,त्वचेवर येईल ग्लो
तांदळाचे पाणी लावल्याने त्वचेला होणारे फायदे
तांदळाचे पाणी तुम्ही टोनर आणि नैसर्गिक क्लेंझर म्हणून त्वचेसाठी वापरू शकता. धावपळीच्या जीवनात काहीवेळा महिलांना त्वचा आणि केसांकडे वेळ द्याल लक्ष भेटतात नाही. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले तांदळाचे पाणी त्वचेला लावून चेहऱ्यावरील टॅन कमी करू शकता. धूळ, माती आणि घाणीमुळे खराब झालेला त्वचेचा रंग सुधारण्यासाठी तांदळाच्या पाण्याचा वापर करा. तयार केलेले तांदळाचे पाणी तुम्ही मेकअप करण्याआधी त्वचेला लावून ते सुकल्यानंतर त्यावर मेकअप करू शकता. तर तांदळाचे पाणी टाकून 10 ते 15 मिनिटं ठेवून ते कोरडे झाल्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या.