केसांच्या वाढीसाठी घरगुती गुणकारी पेय
केसांच्या मजबूत आणि चमकदार वाढीसाठी अनेक पदार्थ खाल्ले जातात. पण तरीसुद्धा केसांची हवीतशी वाढ होत नाही. वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम मोठ्या प्रमाणावर केसांवर दिसून येतो. सतत केस गळणे,केसात कोंडा होणे, केस तुटणे, केसांची गुणवत्ता खराब होणे, तेल न लावता केस चिकट किंवा तेलकट होणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. या सर्व समस्या जाणवू लागल्यानंतर केसांची वाढ पूर्णपणे खुंटते. तर अनेकांचे केस कमी वयात पांढरे होऊन जातात. वातावरणातील बदलांचा आणि शरीरात सतत होणाऱ्या हार्मोनल बदलांचा परिणाम महिलांच्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. यावर आज आम्ही तुम्हाला सोपा आणि प्रभावी पेय सांगणार आहोत. हे पेय प्यायल्यामुळे तुमच्या केसांच्या वाढीसोबतच शरीराची सुद्धा वाढ होईल.(फोटो सौजन्य-istock)
केसांच्या वाढीसाठी कढईमध्ये चिया सीड्स टाकून ते व्यवस्थित भाजून घ्या. त्यानंतर त्यात जवसाच्या बिया टाकून भाजा. नंतर त्यात सूर्य फुलाच्या बिया टाकून व्यवस्थित भाजून घ्या. सगळ्यात शेवटी कढईमध्ये मखणा टाकून व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत भाजा. त्यानंतर हे सर्व पदार्थ थंडझाल्यावर बारीक पावडर तयार करून घ्या. तयार केलेली पावडर एक ग्लास दुधात टाकून आठवड्यातून एकदा किंवा दोनदा सकाळी आणि संध्याकाळी नियमित प्या. तसेच तुम्ही त्यात खजूर किंवा बदाम सुद्धा घालू शकता. यामुळे शरीराला ऊर्जा भेटेल.हे पेय तुम्ही आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा सुद्धा पिऊ शकता.यामुळे तुमचे वजन वाढून शरीराला सुद्धा फायदे होतील.केस, त्वचा आणि आरोग्यसाठी अनेक फायदे होतात.
केसांच्या वाढीसाठी घरगुती गुणकारी पेय
हे देखील वाचा: लाल केळी माहित्येत का? आहारात समाविष्ट केल्यास मिळतात आरोग्यदायी फायदे
जवसाच्या बियांमध्ये ओमेगा 3 , ॲण्टीऑक्सिडंट्स आढळून येते, ज्यामुळे केसांची वाढ मजबूत होते. तसेच चिया सीड्सचे सेवन केल्यामुळे ओमेगा 3 , प्रोटीन्स, झिंक शरीराला मिळतेमी ज्यामुळे शरीरातील उष्णता कमी होऊन आरोग्याला फायदे होतात. सुर्यफूलच्या बियांमध्ये विटामिन ई, झिंक, सेलेनियम घटक आढळून येतात. तसेच भोपळ्याच्या बिया खाल्ल्यामुळे झिंक, लोह, ओमेगा 3 शरीराला मिळते.