मेष राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे. ज्योतिशि अभ्यासानुसार मेष राशीसाछी नवे वर्ष म्हणजेचे २०२३ हे शुभ असणार आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच मेष राशीच्या लोकांना याचा अनुभव येईल. काही चांगले अनुभव, सुरुवात होईल. राजकारणात असलेल्यांना याचा लाभ होईल. उच्चपदस्थानांही त्याचा फायदा होणार आहे. फॅशन आणि ग्लॅमर क्षेत्रात काम करणाऱ्यांनाही नववर्षाच्या सुरुवातीला फायदा होण्य़ाची शक्यता आहे. ग्रह-नक्षत्रांनुसार हे वर्ष कसं असेल यावर एक नजर टाकूयात.
[read_also content=”2023 या नवीन वर्षात महाराष्ट्रात होणार महत्त्वाचे व मोठे नागरी पायाभूत प्रकल्प, कोण-कोणते आहेत 10 प्रकल्प? जाणून घ्या… https://www.navarashtra.com/maharashtra/important-and-big-mega-projects-in-maharashtra-in-this-year-who-are-the-top-ten-projects-find-out-358345.html”]
आर्थिक स्थिती – मेष राशी असणाऱ्यांना आर्थिक स्थितीत या वर्षी फायदा दिसतो आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. मात्र २०२३ या वर्षांत तुमच्या शत्रूंपासून तुम्हाला सावध राहावे लागणार आहे. तुमच्या जीभेवर तुमचं नियंत्रण हवं. तुमच्या रागावरही नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे.
नोकोरी आणि व्यापार– नव्या वर्षात व्यापाराला गती मिळेल. या वर्षभराच्या काळात तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. ज्या क्षेत्रात काम सुरु कराल त्यात तुम्हाला यश मिळल्याशिवाय राहणार नाही. नोकरी करणाऱ्यांना या वर्षभरात नव्या संधी मिळतील.
लव्ह लाईफ– मेष राशी असणाऱ्यांचे लव्ह लाईफ या वर्षात चांगले असेल. अविवाहितांसाठी नवे विवाहांचे प्रस्ताव या वर्षात येतील. या नव्या वर्षआंत आपली नाती अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. या वर्षभरात घरात आणि नात्यात शांतता नांदेल. वर्षअखेरीस विशेष काळजी घेण्याची गरज आहे. तुमच्या वागणुकीमुळे नात्यांत कटुता निर्माम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रकृती – प्रकृतीचा विचार केल्यास, २०२३ हे नवे वर्ष अडचणीचे ठरण्याची शक्यता अधिक आहे. या वर्षभरात प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. खाण्यापिण्यावर विशेष लक्ष ठेवण्याची गरज आहे.