बारीक होण्यासाठी बाबा रामदेव यांचे डाएट
आजच्या व्यस्त जीवनात बिघडलेली जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे लठ्ठपणा ही एक सामान्य समस्या बनत चालली आहे. लठ्ठपणाची सर्वात मोठी समस्या म्हणजे लठ्ठपणा आपल्यासोबत अनेक रोगांचे पॅकेज घेऊन येतो. एकदा तुमचे वजन वाढले की ते कमी करणे म्हणजे एव्हरेस्ट चढण्यासारखे आहे. जर तुम्हीही तुमच्या वाढत्या वजनाने हैराण असाल आणि ते कमी करू इच्छित असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी योगगुरू स्वामी रामदेव यांनी सुचवलेला आयुर्वेदिक आहार घेऊन आलो आहोत.
बरं, तब्येतीच्या बाबतीत बाबा रामदेव यांच्यापेक्षा चांगलं कोण सांगू शकेल? बाबा रामदेव स्वामी यांनी या डाएट प्लॅनमध्ये खूप सोप्या पद्धती सांगितल्या आहेत ज्याच्या मदतीने तुम्ही एका महिन्यात बरेच वजन कमी करू शकता. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम/iStock)
नाश्त्यात खावा दलिया
नाश्त्यात दलियाचा करा समावेश
बाबा रामदेव यांच्या मते, जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर नियमितपणे नाश्त्यात पौष्टिक दलियाचे सेवन करा. गहू, बाजरी, मूग, तांदूळ, तीळ आणि ओवा यांचे मिश्रण करून ही खास लापशी तयार केली जाते. नाश्त्यात हे खाल्ल्यानंतर पोट बराच वेळ भरलेले राहते, त्यामुळे भूक लागत नाही. कारण यामध्ये जास्त प्रमाणात फायबर तर असतेच, यासोबतच शरीराला आवश्यक पोषक तत्वेदेखील मिळतात. नाश्त्यात लापशीचे नियमित सेवन केल्यास वजन बऱ्याच अंशी नियंत्रणात ठेवता येते.
नेहमी प्यावा दुधीचा रस
दुधीचा रस नियमितपणे पिणे ठरेल फायदेशीर
बाबा रामदेव यांच्या म्हणण्यानुसार, दुधीचा ज्यूस वजन कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. हे प्यायल्याने पोट बराच काळ भरलेले राहते, ज्यामुळे भूकदेखील नियंत्रित राहते. दुधीचा रस नियमित प्यायल्याने वाढलेले वजन लवकर आटोक्यात येते. तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात ही ताज्या दुधीच्या रसाने करू शकता.
दुधीच्या भाजीमध्ये विटामिन B, C, फायबर आणि याशिवाय पोटॅशियम, लोह हे घटक आढळतात. रोज सकाळी दुधीचा रस पिण्याने वजन तर कमी होतेच. त्याशिवाय डायबिटीस, कोलेस्ट्रॉलसारखे आजार असल्यास तुम्हाला अधिक फायदा मिळतो आणि हे आजार कमी होण्यास मदत मिळते.
हेदेखील वाचा – Weight Loss: 1 महिन्यात 5 किलो वजन कसे कमी होईल? AI चे मजेशीर उत्तर
रोज खावीत अश्वगंधाची पाने
अश्वगंधांच्या पानांचा फायदा
बाबा रामदेव यांच्या सांगण्यानुसार, अश्वगंधाच्या पानांचे नियमित सेवन केल्यास एका महिन्यात 15 ते 20 किलो वजन कमी करता येते. अश्वगंधाच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे चयापचय वाढवतात आणि चरबीचे संचय कमी करतात. हे खाल्ल्याने वजन झपाट्याने कमी होते. बाबा रामदेव यांच्या मते, अश्वगंधाच्या तीन पानांचे नियमितपणे सकाळ, दुपार आणि संध्याकाळ सेवन केल्याने शरीरातील चरबी कमी होते.
काय सांगतात बाबा रामदेव