कधीच खराब होणार नाही लिव्हर! आहारात करा 'या' फळाचे सेवन
दीर्घयुषी राहण्यासाठी शरीरातील सर्वच अवयव कायमच निरोगी असणे अतिशय महत्वाचे आहे. शरीरात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीराची कायमच काळजी घ्यावी. शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे लिव्हर. रक्त शुद्ध करणे, विषारी घटक बाहेर काढून टाकणे, अन्नपदार्थ पचन करणे आणि हार्मोन्सचे संतुलन इत्यादी अनेक कामे लिव्हर करते. पण धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. आहारात सतत होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन, मानसिक ताण, पॅक बंद पदार्थांचे सेवन किंवा सतत मद्यपान करत राहिल्यामुळे शरीराला हानी पोहचते. यकृतामध्ये अनावश्यक चरबी जमा होण्यास सुरुवात झाल्यानंतर पोटात वेदना होणे, ओटीपोटात वेदना होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. लिव्हर खराब झाल्यानंतर शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. त्यामुळे लिव्हर डिटॉक्स करणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)
लिव्हरसबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी अॅव्होकॅडो खावा. अॅव्होकॅडोच्या सेवनामुळे लिव्हरसबंधित समस्या दूर होतात. बेचव लागणारे फळ लिव्हर स्वच्छ करण्यासाठी मदत करते. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, चांगली चरबी, जीवनसत्त्वे आणि फायबर इत्यादी अनेक घटक आढळून येतात. नियमित अॅव्होकॅडोचे सेवन केल्यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते आणि हृदयाचे आरोग्य निरोगी राहते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अॅव्होकॅडो खाल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
लिव्हर कायमच निरोगी राहण्यासाठी आहारात अॅव्होकॅडो खावे. अॅव्होकॅडोमध्ये विटामिन सी, ई आणि नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स लिव्हरचे हानिकारक पेशींपासून नुकसान होऊ देत नाहीत. याशिवाय यामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स आढळून येतात, ज्यामुळे लिव्हर डिटॉक्स होते. लिव्हरमध्ये जमा झालेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी अॅव्होकॅडोचे सेवन करावे. यामुळे शरीरातील अन्नपदार्थ पचन होण्यासाठी जास्तीचा वेळ लागत नाही.
यकृत आणि हृदय एकमेकांशी जोडलेले असते . त्यामुळे आहारात अॅव्होकॅडोचे सेवन करावे. यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि भरपूर फायबर मोठ्या प्रमाणावर आढळून येते, ज्यामुळे शरीराचा रक्तदाब नियंत्रणात राहतो. याशिवाय रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात अॅव्होकॅडोचे सेवन करावे. यामुळे हार्ट अटॅक, हार्ट ब्लॉजेक किंवा स्टोकचा धोका कमी होतो.
रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी अॅव्होकॅडोचे सेवन करावे. यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो. अॅव्होकॅडोमधील निरोगी फॅट्स इन्सुलिन संवेदनशीलता सुधारतात आणि साखरेची पातळी कायमच संतुलित ठेवण्यासाठी मदत करता. रक्तात वाढलेल्या साखरेमुळे शरीरातील इतर अवयवांना सुद्धा इजा पोहचण्याची शक्यता असते.
यकृत म्हणजे काय?
यकृत हे शरीरातील एक महत्त्वाचे अवयव आहे, जे अन्न पचवण्यास, रक्तातील विषारी पदार्थ फिल्टर करण्यास आणि शरीराला ऊर्जा पुरवण्यास मदत करते.
यकृताच्या आजारांची लक्षणे?
डोळे आणि त्वचा पिवळी दिसणे.सतत थकवा जाणवणे.विशेषतः पोटाच्या वरच्या भागात दुखणे.उलट्या होणे किंवा मळमळणे.भूक कमी होणे किंवा अन्न न खाण्याची इच्छा होणे.
यकृताच्या आरोग्यासाठी काय करावे?
पालक, केल यांसारख्या पालेभाज्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर असतात, जे यकृतासाठी फायदेशीर आहेत. जास्त मद्यपान यकृताचे नुकसान करते. यकृताच्या समस्या लवकर ओळखण्यासाठी नियमित तपासणी करणे महत्त्वाचे आहे.