फोटो सौजन्य: iStock
पासाळ्याच्या दिवसात वातावरण आनंदमयी असते. पण पावसाळा सोबत येताना अनेक प्रकारची रोगराई सोबत घेऊन येतो. डेंग्यू, मलेरिया सारखे अनेक आजरांचे संक्रमण वाढते. अशा वेळी जर आपली इम्यूनिटी स्ट्रॉग असेल तर आपल्याला कोणताही आजार उद्भवत नाही. यासाठी आपल्या आहारात पौष्टीक पदार्थांचा समावेश असणे अत्यंत आवश्याक आहे. मोड आलेले कडधान्ये तर आपल्या शरीराला अनेक प्रकारचे फायदे देतात. मूग, मटकी, हरभरा यांसारखे मोड आलेले कडधान्ये आपल्या आरेग्यासाठी खूप फायदेशीर आहेत.
मोड आलेल्या कडधान्यांचे सेवन सकाळी केले तर ते अत्यंत लाभदायी ठरते. ही कडधान्ये वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर आहेत. मोड आलेले कडधान्ये शरीराला अनेक आजारापासून वाचवतात, यामुळे शरीराला व्हिटॅमिन सी, फायबर आणि प्रथिने भरपूर प्रमाणात मिळतात. ते खाल्ल्यानतर तुमचे पोट बराच काळ भरलेले राहते.
चला जाणून घेऊया मूग-हरभरा यांसारखे कडधान्य सेवन करण्याचे फायदे काय आहेत?
वजन कमी करण्यात मदत: जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुमच्या आहारात मोड आलेले कडधान्ये मूग, हरभरा यांचा समावेश करा. हे खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. यामध्ये भरपूर फायबर आढळते ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले वाटते. यामुळे शरीराला निरोगी प्रथिने मिळतात. या आहाराचे सेवन तसेच तुम्ही व्यायाम केला तर वजन कमी करण्यासाठीमदत होईल.
पचनसंस्था सुधारते: मोड आलेल्या कडधान्यांमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वे, एन्झाईम्स आढळतात. ज्यामुळे ते सहज पचण्यास मदत होते आणि पचनक्रिया सुधारते. तसेच यातील फायबरच्या मदतीने आतड्याची हालचाल व्यवस्थित होते.
मधुमेहामध्ये फायदेशीर: जर तुम्हाला मधुमेहाचा आजार असेल तर शरीरीतील साखर संतुलित ठेवण्यासाठीमोद आलेले कडधान्य मदत करतात. मोड आलेल्या हरभऱ्यामध्ये आढळणारे कार्बोहाइड्रेट्स आणि फायबर रक्तातील साखरेचे शोषण नियंत्रित करते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या आहारात कडधान्यांचा समावेश करणे आवश्यक आहे.
केस गळती: हरभरा हे व्हिटॅमिन ए, बी6, झिंक आणि मॅगनीज सारख्या जीवनसत्त्वे आणि खनिजांचा चांगला स्रोत आहे. हरभरा खाल्ल्याने केसांचे आरोग्यही सुधारते. जर तुम्हाला केसगळतीचा त्रास केसांची चांगली काळजी घेत असाल तर अंकुरलेले हरभरे आणि मूग नक्कीच खा. यामुळे केस गळणेही कमी होईल.






