तुपामध्ये मिक्स करा 'हा' तिखट पदार्थ, शरीराला होतील प्रभावी फायदे
तूप खाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. थंडीच्या दिवसांमध्ये किंवा इतर वेळी तुपाचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील. तूप खाल्यामुळे त्वचा हायड्रेट आणि चमकदार राहते. त्यामुळे दैनंदिन आहारात नेहमी तुपाचे सेवन करावे. तुपामध्ये विटामिन ए, सी, फ्लेव्होनॉइड्स आणि अँटिऑक्सिडेंट,विटामिन ए, डी, ई आणि के इत्यादी अनेक घटक आढळून येतात. पचनसंबंधित समस्या किंवा इतर कोणत्याही समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी तुपाचे सेवन करावे. याशिवाय तूप आणि काळीमीरीचे एकत्र सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतात.(फोटो सौजन्य – iStock)
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
तूप आणि काळीमिरी खाल्यामुळे पापण्यांवर आलेले मुरूम, शरीरातील घाण स्वच्छ होऊन जाते. त्वचेवर आलेले मुरूम घालवण्यासाठी तुपाचे आणि काळीमीरीचे एकत्र सेवन करावे. यासाठी एक चमचा तुपात अर्धा चिमूटभर काळिमिरी पावडर टाकून मिक्स करून खावे. यामुळे चेहऱ्यावर आलेले मोठे मोठे पिंपल्स कमी होऊन त्वचा स्वच्छ होते. आज आम्ही तुम्हाला तूप काळीमिरी एकत्र खाल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात, याबदलन सांगणार आहोत.
थंडीच्या दिवसांमध्ये सर्दी, खोकला इतर श्वसनाच्या समस्या वाढू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी तूप आणि काळीमीरीचे सेवन करावे. यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. हे पदार्थ खाल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती निरोगी राहण्यास मदत होते. याशिवाय छातीमध्ये दुखत असलेल्या किंवा कफ झाल्यानंतर चिमूटभर काळी मिरी पावडर एक चमचा तुपात मिक्स करून खावी. यामुळे छातीत दुखणे थांबेल आणि आराम मिळेल.
सर्वच ऋतूंमध्ये महिलांसह पुरुषांना त्वचा आणि केसांसंबंधित समस्या जाणवू लागतात. या समस्या जाणवू लागल्यानंतर अनेक लोक डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करतात. मात्र त्यासोबतच घरगुती पदार्थांचे सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतील. यामुळे त्वचा सुंदर आणि चमकदार होईल. केसांच्या वाढीसाठी घरगुती उपाय करून पाहावे.
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकदा शारीरिक तणाव निर्माण होतो. शिवाय मानसिक तणाव निर्माण झाल्यानंतर त्यातून बाहेर पडणे अनेकदा कठीण होऊन जाते. अशावेळी मानसिक तणाव कमी करण्यासाठी तूप आणि काळीमीरीचे सेवन करावे. तूप काळीमिरीच्या सेवनामुळे मानसिक तणाव कमी होतो.