किडनीच्या निरोगी आरोग्यासाठी आहारात करा 'या' फळांचे सेवन
धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये होणारे बदल, अपुरी झोप, जंक फूडचे सेवन, तेलकट किंवा तिखट पदार्थ खाणे इत्यादी अनेक गोष्टींमुळे आरोग्य बिघडू लागते. निरोगी आरोग्य जगण्यासाठी शरीराचे सर्वच अवयव अतिशय महत्वाचे आहेत. त्यातील सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे किडनी. किडनीचे आरोग्य बिघडल्यानंतर शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. किडनीचे आरोग्य निरोगी ठेवणे अतिशय आवश्यक आहे. कारण शरीरात साचून राहिलेले विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी किडनी निरोगी असणे आवश्यक आहे. पण शरीरातील विषारी घटक तसेच किडनीमध्ये साचून राहिल्यास आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला किडनीच्या निरोगी आरोग्यासाठी दैनंदिन आहारात कोणत्या फळांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये बाजारात कलिंगड हे फळ उपलब्ध असते. कलिंगड खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. याशिवाय कलिंगडमध्ये भरपूर पाणी असते, ज्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. दैनंदिन आहारात नियमित कलिंगड खाल्यास किडनीचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. या फळाचे सेवन केल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि आरोग्य सुधारते.
लिंबूमध्ये विटामिन सी मुबलक प्रमाणात आढळून येते. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून सेवन करावे. यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. लिंबाच्या रसात असलेल्या गुणधर्मांमुळे त्वचासुद्धा सुधारण्यास मदत होते. किडनीचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी कोमट पाण्यात लिंबू मिक्स करून प्यावा.
डॉक्टर नियमित एक सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. सफरचंद खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. यामध्ये आढळून येणारे फायबर शरीरातील घाण स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे रोजच्या आहारात नियमित एक सफरचंद खावे. सफरचंद खाल्यामुळे कोलेस्टेरॉल कमी होऊन शरीराला आलेली सूज कमी होते.
अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असलेली जांभळं खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. चवीला तुरट आणि गोड असलेली जांभळं किडनीच्या आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहेत. यामुळे किडनीचे रक्षण होते.
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
चवीला आंबट गोड असलेला अननस खायला सगळ्यांचं खूप आवडतो. अननस खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. यामध्ये कमी पोटॅशियम असलेले ब्रोमेलैन आढळून येते, त्यामुळे अननसाचे सेवन करावे. ब्रोमेलैन हा एंजाइम सूज कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे.