केशर खाण्याचे फायदे
किंमतीने महाग असलेले लाल रंगाचे केशरआरोग्यासाठी गुणकारी आहे. केशरमध्ये अँटिऑक्सिडंट मुबलक प्रमाणात आढळून येतात. तसेच केशरचे नियमित सेवन केल्यामुळे त्वचेला अनेक फायदे होतात. जगातील सगळ्यात महागडे केशर इराण मध्ये पिकवले जातात. ज्याची किंमत लाखोंच्या घरात आहे. मागील काही दिवसांपासून इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरु आहे. ज्याचा परिणाम अनेक गोष्टींवर झाला आहे. इराणमध्ये पिकवल्या जाणाऱ्या केशरला ‘रेड गोल्ड’ असे म्हणतात. या केशरचे सेवन केल्यामुळे चांगले मूड, लैंगिक कार्य, वजन कमी होण्यास मदत होते. तसेच त्वचेवर आलेली ऍलर्जी किंवा पुरळ घालवण्यासाठी इराणमधील लाल केशर अतिशय प्रभावी आहे. आज आम्ही तुम्हाला इराणमधील लाल केशराचे गुणकारी फायदे सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
केशरची किंमत महाग असली तरीसुद्धा अनेक लोक केशरचा वापर दैनंदिन आहारात आवर्जून करतात. केशर खाल्ल्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. लाल रंगाच्या केशरचे सेवन केल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते. केशरमध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात. तसेच मसाले बनवण्यासाठी केशरचा वापर केला जातो. यामुळे मसाल्याची चव आणि सुगंध वाढण्यास मदत होते. केशर खाल्ल्यामुळे रक्ताभिसरण आणि उत्सर्जन प्रणाली, मज्जासंस्थेवर चांगले परिणाम दिसतात. तसेच तुम्ही तुमच्या वयापेक्षा 10 वर्षांनी लहान आणि तरुण दिसू लागता.
हे देखील वाचा: सतत च्युईंगम चघळणे आरोग्यासाठी ठरेल घातक! जाणून घ्या आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम
हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी केशरचा आहारात समावेश करा. केशर खाल्ल्यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहते. केशरमध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंट गुणधर्मांमुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी दुधातून केशरचे सेवन करावे. यामुळे तुमचे हृद्य सुरक्षित राहते.
केशरमध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म आढळून येतात. यामध्ये भरपूर प्रमाणात असलेल्या अँटिऑक्सिडंट्समुळे शरीराचे फ्री रॅडिकल्समुळे होणारे नुकसान टाळता येते. केशर खाल्ल्यामुळे शरीराचा कर्करोगापासून बचाव होतो.
केशर खाण्याचे फायदे
केशरचे नियमित सेवन केल्यामुळे मानसिक तणाव आणि नैराश्य कमी होतो. दररोज 30 मिलीग्राम केशर खाल्ल्याने नैराश्य कमी होण्यास मदत होते. तसेच वाढलेले वजन कमी करण्यासाठी तुम्ही आहारात केशरचे सेवन करू शकता. केशर खाल्ल्यामुळे वारंवार भूक लागत नाही. तसेच बॉडी मास इंडेक्स, कंबरेची चरबी झपाट्याने कमी होऊ लागते.
हे देखील वाचा: दुधासोबत या 5 गोष्टी चुकूनही खाऊ नका
त्वचेवरील पुरळ, पिंपल्स, सुरकुत्या कमी करण्यासाठी आठवड्यातून एकदा केशर फेसपॅक चेहऱ्यावर लावावा. यामुळे त्वचा रोग बरे होतात. त्वचेवरील काळेपणा कमी होऊन त्वचा उजळदार होण्यास मदत होते. रात्रीच्या वेळी झोपताना तुम्ही एक ग्लास दुधात ३ ते ४ काड्या केशर टाऊन दूध पिऊ शकता. हे दूध प्यायल्यामुळे अनेक समस्या कमी होतात.