तांदळाच्या पाण्याचे त्वचेला होणारे फायदे
सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी महिला सतत काहींना काही उपाय करत असतात. कधी घरगुती तर कधी केमिकल ट्रीटमेंट केल्यामुळे त्वचेची गुणवत्ता खराब होण्यास सुरुवात होते. सुंदर आणि गोरीपान त्वचा मिळवण्यासाठी जसा हळद आणि बेसनाचा वापर केला जातो, तसाच वापर तांदळाच्या पाण्याचा सुद्धा केला जातो. तांदळाच्या पाण्यात सुद्धा अनेक गुणधर्म आढळून येतात. सोशल मीडियावर हल्ली कोरियन स्किन केअरचा मोठा ट्रेंड आला आहे. कोरियन स्किन केअर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असल्याने अनेक महिला याचा वापर करत आहेत. कोरियन स्किन केअरमध्ये तांदळाच्या पाण्याचा वापर त्वचेला लावण्यासाठी केला जातो.
तांदळाचे पाणी त्वचेला लावल्यामुळे चेहऱ्याचा रंग उजळण्यास मदत होते. तसेच त्वचेची गुणवत्ता सुधारते. एवढंच नसून बाजारात अनेक वेगवेगळ्या ब्रँडचे कोरियन स्किन केअर प्रॉडक्ट उपलब्ध आहेत. ज्यांचा वापर केल्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार राहते. बाजारात मिळणारे महागडे कोरियन स्किन केअर प्रॉडक्ट वापरण्याऐवजी तुम्ही घरीच तुम्ही तांदळाचे पाणी बनवून लावू शकता. यामुळे त्वचेची गुणवत्ता सुधारते. आज आम्ही तुम्हाला तांदळाच्या पाण्याचा वापर कशा प्रकारे करावा, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: या गोष्टी दुधात मिसळून प्यायल्याने मिळतील आश्चर्यकारक फायदे
तांदळाचे पाणी बनवण्यासाठी सर्वप्रथम वाटीभर तांदूळ घेऊन स्वच्छ करून घ्या. त्यानंतर त्यात पाणी टाकून तांदूळ स्वच्छ धुवा. तांदूळ धुवून झाल्यानंतर त्यात पाणी टाकून 5 तास तांदूळ भिजण्यासाठी ठेवा. तांदूळ व्यवस्थित भिजल्यानंतर त्यातील पाणी काढून घ्या किंवा तांदूळ 5 मिनिटं शिजवून त्यातील पाणी बाजूला काढा. तांदळाचे पाणी थंड झाल्यानंतर तुम्ही वापरू शकता.
तांदळाच्या पाण्यात जीवनसत्त्वे, खनिजे आणि भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट आढळून येतात. ज्यामुळे त्वचा सुंदर आणि चमकदार होण्यास मदत होते. त्वचेवर पिंपल्स किंवा मुरूम आल्यानंतर इतर कोणतेही पदार्थ लावण्याऐवजी नियमित तांदळाचे पाणी लावावे. यामुळे चेहऱ्यावर आलेले सर्व पिंपल्स, पिंपल्सचे डाग निघून जाण्यास मदत होईल.
हे देखील वाचा: दिवाळीआधी स्लिम दिसायचं? मग नियमित करा ‘या’ पेयाचे सेवन, काही दिवसांमध्येच दिसेल फरक
तांदळाचे तयार केलेले पाणी अंघोळ करण्याआधी चेहऱ्यावर स्प्रे करा. त्यानंतर 5 मिनिट ठेवून नंतर चेहरा स्वच्छ करा. यामुळे खराब झालेली त्वचा पुन्हा एकदा व्यवस्थित होईल. किंवा तुम्ही तांदळाच्या पाण्यात कापूस बुडवून पाणी तोंडाला लावू शकता.