मेथी दाण्यांचे पाणी पिण्याचे फायदे
वाढलेल्या वजनाने अनेक लोक त्रस्त आहेत. वजन वाढल्यानंतर जीवनशैलीमध्ये बिघाड होऊन जातो. त्यामुळे खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी फॉलो न करता शरीराला पचेल असा सकस आहार घेणे गरजेचे आहे. सतत बाहेरच्या पदार्थांचे सेवन करणे, अपुरी झोप, कधीही जेवणे इत्यादी अनेक गोष्टीमुळे आरोग्य बिघडून जाते, ज्यामुळे लठ्ठपणा सारख्या गंभीर समस्या उद्भवतात. शारीरिक हालचाली कमी झाल्यानंतर सुद्धा वजन वाढण्यास सुरुवात होते. शरीरात वाढलेली अतिरिक्त चरबी आरोग्यासाठी घातक आहे. यामुळे कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब, मधुमेह इत्यादी आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे धावपळीच्या जीवनातून थोडा वेळ काढून आरोग्याकडे लक्षणे देणे सुद्धा गरजेचे आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करण्यासाठी कोणत्या पदार्थाचे पाणी बनवून नियमित प्यावे. हे पाणी प्यायल्यामुळे शरीरावर जमा झालेली अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होईल.
मेथी दाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आणि प्रभावी आहेत. मेथी दाण्यांचे सेवन केल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. माथी दाण्यांमध्ये सोडियम, झिंक, फॉस्फरस, फॉलिक ॲसिड, पोटॅशियम, लोह, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम इत्यादी अनेक घटक आढळून येतात. शिवाय यात विटामिन ए, विटामिन बी आणि विटामिन सी आढळून येते. फायबर युक्त मेथी दाणे शरीरावर वाढलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी मदत करतात.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: फॅटी लिव्हरमुळे चेहरा खराब झाला आहे? ‘ही’ लक्षणे दिसताच त्वचेची घ्या काळजी
सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी मेथी दाण्यांचे पाणी पिणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. कारण रिकाम्या पोटी मेथीचे पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते आणि शरीरावरील चरबी कमी होण्यास मदत होते. मधुमेह असलेल्या रुग्णांनी नियमित मेथी दाण्यांचे सेवन केले तर रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होईल.
मेथी दाण्यांचे पाणी बनवण्यासाठी सर्वप्रथम एक ग्लास पाणी घेऊन त्यात अर्धा चमचा मेथी दाणे टाकून रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी उठल्यावर मेथी दाण्यांच्या पाण्यासोबत मेथीचे दाणे बारीक चावून खावेत. जेणेकरून शरीराला फायदे होतील. हे पाणी १५ दिवस नियमित प्यायल्यास पोटावर आणि शरीराच्या इतर भागांवर साचलेली चरबी कमी होईल.
हे देखील वाचा: अंघोळ करताना एकच साबण वापरत असाल तर थांबा! जाणून घ्या त्वचेवर होणारे दुष्परिणाम
वाढलेले वजन कमी करण्यासाठी नियमित मेथी दाण्यांचे पाणी प्यावे. हे पाणी प्यायल्यामुळे शरीरावरील लठ्ठपणा कमी होईल. मेथी दाण्यांचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारते. मधुमेह असलेल्या रुग्णांनी नियमित मेथी दाण्यांच्या पाण्याचे सेवन करावे. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होईल.छातीमध्ये आणि पोटात होणारी जळजळ कमी करण्यासाठी मेथी दाण्यांचे पाणी प्यावे.