बदलत्या जीवनशैलीचा परिणाम शरीरावर देखील होतो. खास करुन महिलांच्या मासिकपाळीवर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. मासिक पाळीच्या दिवसात किती त्रास होत असला तरी ऑफिसला सुट्टी घेणं शक्य नसतं किंवा पूर्णत: आपण घरात वेळ काढणं शक्य नसतं. कधी प्रवासाच्या दगदगीमुळे मासिकपाळीच्या काळात अनेकदा कपडे खराब होतात. मासिकपाळीत होणाऱ्या अतिरिक्त रक्तस्त्रावामुळे कपड्य़ांना डाग लागतात आणि काही केल्या हे डाग निघता निघत नाही. त्यामुळे कपड्यांचे डाग काढण्यासाठी काय करावं हेच मोठं आव्हान आहे. पाळीच्या काळात कपडे खराब झाल्यावर काय करावं याबाबत जाणून घेऊयात.
मासिक पाळीतील रक्तस्त्राव हा अतिरिक्त होत असून यामुळे लागलेले डाग खूप घट्ट असतात. बऱ्याचदा कपड्यांना लागलेले डाग हे घाणेरडे वाटतात. त्यामुळे कपड्यांवरचे जंतू जावेत म्हणून अनेक महिला हे कपडे गरम पाण्यात भिजवतात किंवा या कपड्यांवर गरम पाणी टाकतात. यामुळे होतं असं की कपड्यांवर असलेले डाग निघण्याऐवजी ते अधिकच घट्ट होतात. सहजा तुम्ही हलक्या रंगांचे किंवा कॉटर्नचे कपडे वापरत असाल आणि त्यांना डाग लागले तर हे कपडे गरम पाण्यात न टाकता थंड पाण्याने स्वच्छ करा. थंड पाणी आणि साबणाने कपडे स्वच्छ केल्याने डाग नाहीसे होण्यास मदत होते. मासिक पाळीच्या दिवसांत गडद रंगाचे कपडे वापरणं फायदेशीर ठरतं.
कपड्यांना डाग लागू नयेत यासाठी काय काळजी घ्यावी ?
दर ४–६ तासांनी सॅनिटरी नॅपकिन बदलणे आवश्यक आहे. जास्त वेळ ठेवले तर इन्फेक्शन होऊ शकतं आणि त्याचप्रमाणे कपडे देखील खराब होऊ शकतात. बऱ्याच जणी सध्या पिरेड्स पॅन्टी देखील वापरतात. या पिरेड्स पॅन्टीचा फायदा असा की, यामुळे अतिरिक्त रक्तस्त्रावामुळे डाग लागत नाही.
आलं आणि लिंबाचा रस
कपड्यांवरचे डाग जाण्यासाठी आलं आणि लिंबाचा रस वापरण्याने डाग नाहीसे होतात. लिंबाचा आणि आल्याचा रस हे पारंपरिक उपाय आहेत. त्यामुळे डाग निघून जाण्यास मदत होते.
व्हाईट व्हिनेगर :- कपड्याच्या ज्या भागावर रक्तस्त्रावाचे डाग जास्त लागले आहे, त्यावर व्हाईट व्हिनेगर लावा. १० ते १५ मिनिटे ते तसेच राहू द्या. नंतर ब्रशच्या मदतीने हे डाग घासून घ्यावेत. सगळ्यात शेवटी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे. अशाप्रकारे आपण व्हाईट व्हिनेगरचा वापर करुन कपड्यावरचे डाग घालवू
शकता.