फोटो सौजन्य - Social Media
काही वर्षांपासून इन्फ्लुएन्सर नावाचा प्रकार फार तेजीने वाढत आहे. आताच्या पिढीतील तरुण तरुणींना या व्यवसायात फार मोठा रस आहे. या रसाला छंद म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. अनेक तरुण आपल्या आवडी-निवडी तसेच कला जोपासत या क्षेत्रामध्ये मोठे नाव करत आहेत. त्यांना फार मोठा प्रेक्षकवर्ग या सोशल मीडियावर साध्य होत आहे. तशी पाहायला गेले तर जगातील फार मोठी लोकसंख्या सोशल मीडियावर सक्रिय आहे. त्यातील बहुतेक जणांना सोशल मीडिया सतार व्हायचे आहे. आपली कला लोकांपर्यंत पोहचवायचे आहे. आपल्या विचारांनी समाजामध्ये जागरूकता निर्माण करायची आहे. परंतु, प्रत्येकाची इच्छा इथे पूर्ण होत नाही कारण प्रत्येकाकडे सोशल मीडिया चालवण्याचे कौशल्य नाही.
हे देखील वाचा : मानेवरील काळेपणा घालवण्यासाठी स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थाचा करा वापर, काही दिवसात चमकेल मान
सोशल मीडियावर तेच पुढे जात असतात, ज्यांच्याकडे सोशल मीडियाला समजण्याचे कौशल्य असते. शेअर बाजाराचे उदाहरण घेऊ कि शेअर बाजारामध्ये तोच टिकतो ज्याला शेअर बाजारातील बारीक सारीक गोष्टी समजतात. याच प्रकारे सोशल मीडियावरील प्रत्येक गोष्टींना समजून अंदाज बांधणे फार फायद्याचे ठरते. सध्या सोशल मीडियावर इंस्टाग्रामचे राज्य आहे. तरी बऱ्यापैकी लोकं आणखीन फेसबुकचा वापर करतात. लिंकेडीन, X तसेच युट्युबसाठी मोठा प्रेक्षकवर्ग आहे.
फेसबुकवर पोस्ट करण्यासाठी सकाळी ९ ते १२ वेळ अतिशय चांगली आहे. तसेच संध्याकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत फेसबुकवर पोस्ट करणे फार फायद्याचे मानले जाते. यावेळी लोक त्यांच्या ऑफिसच्या ब्रेकमध्ये किंवा कामानंतर सोशल मीडियावर सक्रिय असतात. X वर पोस्ट करण्यासाठी सकाळी ८ ते १० चा वेळ फार उत्तम आहे, तसेच दुपारी १२ ते १ वेळही अगदी फायदेशीर आहे. लोकं X साधारणपणे बातम्या तसेच ताज्या घडामोडींसाठी वापरतात, तर यासाठी ही वेळ परफेक्ट आहे. लिंक्डइन वसायिक प्लॅटफॉर्म असल्यामुळे सकाळी 7 ते 9 आणि दुपारी 12 ते 2 या व्यावसायिक वेळेत पोस्ट करणे अधिक सोयीस्कर तसेच प्रभावी ठरेल.
हे देखील वाचा :
तडक न देता १० मिनिटांमध्ये बनवा चमचमीत आवळ्याची चटणी, त्वचेलासुद्धा होतील फायदे
इंस्टाग्रामवर व्हिज्युअल कंटेंट जास्त पाहिले जाते. रिकाम्या वेळेमध्ये लोकं जास्त इंस्टाग्रामला प्राधान्य देतात. तसेच इंस्टाग्राम आजच्या काळामध्ये ट्रेंड सेटर आहे, तसेच करिअर मेकर आहे. या प्लॅटफॉर्मवर सकाळी १० ते ११ तसेच रात्री ८ ते ९ वाजता पोस्ट करणे जास्त प्रभावी ठरेल. एखादी गोष्ट सोशल मीडियावर पोस्ट करताना आपण काय पोस्ट करत आहोत? तसेच आपली ऑडियन्स कोण आहे? याच्या उत्तराच्या आधारे पोस्ट करणे अधिक सोयीस्कर ठरते.