Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Weekend Trip: वीकेंड ट्रिपचा प्लॅन करताय? मुंबई-पुणेपासून हाकेच्या अंतरावर आहेत ‘ही’ सुंदर ठिकाणं, ठरतील बेस्ट पिकनिक स्पॉट्स

Best Picnic Spots Near Mumbai: तुम्ही देखील मित्रांसोबत वीकेंड ट्रिपचा प्ल्रन करत असाल तर मुंबई-पुणेपासून हाकेच्या अंतरावर असलेली या सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 29, 2026 | 08:42 PM
Weekend Trip: वीकेंड ट्रिपचा प्लॅन करताय? मुंबई-पुणेपासून हाकेच्या अंतरावर आहेत ‘ही’ सुंदर ठिकाणं, ठरतील बेस्ट पिकनिक स्पॉट्स
Follow Us
Follow Us:

दररोजच्या धावपळीच्या आयुष्यातून थोडासा ब्रेक घेण्यासाठी वीकेंड ट्रिप हा उत्तम पर्याय ठरतो. मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये राहणारे अनेकजण शनिवार-रविवारी जवळच्या ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. नैसर्गिक सुंदरता, कोसळणारे धबधबे, शांत वातावरण आणि थंड हवामान यामुळे काही ठिकाणे पिकनिकसाठी खास लोकप्रिय आहेत. मुंबई आणि पुण्याजवळ अशी अनेक सुंदर पर्यटनस्थळे आहेत, जिथे कमी वेळात आणि कमी खर्चात उत्तम वीकेंड ट्रिप करता येते. निसर्ग, समुद्रकिनारे आणि शांत वातावरणाचा आनंद घ्यायचा असेल तर या ५ ठिकाणांना नक्की भेट द्या आणि तुमचा वीकेंड खास बनवा.

Migraine: कडाक्याच्या उन्हात मायग्रेनचा त्रास वाढतोय? ‘हे’ प्रभावी उपाय देतील आराम

लोणावळा

मुंबई आणि पुण्यापासून अगदी जवळ असलेले लोणावळा हे सर्वात लोकप्रिय वीकेंड डेस्टिनेशन आहे. हिरवेगार डोंगर, धुक्याने भरलेले वातावरण आणि सुंदर धबधबे यामुळे पर्यटक येथे मोठ्या प्रमाणात येतात. भुशी डॅम, टायगर पॉइंट आणि कार्ला लेणी ही येथील खास आकर्षणं आहेत. पावसाळ्यात तर लोणावळ्याचे सौंदर्य आणखी खुलून दिसते.

अलिबाग

जर तुम्हाला बीच आणि शांत वातावरण आवडत असेल तर अलिबाग हा उत्तम पर्याय आहे. मुंबईहून फेरीने आणि पुण्याहून रस्त्याने येथे सहज पोहोचता येते. अलिबाग बीच, किहीम बीच आणि कुलाबा किल्ला ही येथे पाहण्यासारखी ठिकाणे आहेत. मित्रमैत्रिणींसोबत रिलॅक्स वीकेंडसाठी हे ठिकाण परफेक्ट मानले जाते.

भंडारदरा

अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा हे अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे. येथे असलेले आर्थर लेक, रंधा फॉल्स आणि कळसूबाई शिखर पर्यटकांना आकर्षित करतात. शहराच्या गोंगाटापासून दूर शांत वेळ घालवायचा असेल तर भंडारदरा हा बेस्ट पर्याय आहे.

माथेरान

माथेरान हे महाराष्ट्रातील सर्वात वेगळे हिल स्टेशन मानले जाते. येथे वाहनांना प्रवेश नसल्यामुळे प्रदूषणमुक्त वातावरण अनुभवायला मिळते. घोडेस्वारी, टॉय ट्रेन आणि विविध पॉइंट्सवरून दिसणारे निसर्गदृश्य पर्यटकांना आकर्षित करतात. कुटुंबासोबत निवांत वेळ घालवण्यासाठी माथेरान उत्तम ठिकाण आहे.

पावना लेक

पुण्याजवळील पावना लेक हे कॅम्पिंग आणि बोनफायरसाठी प्रसिद्ध आहे. तलावाच्या काठावर कॅम्प लावून रात्रीचा सुंदर अनुभव घेता येतो. मित्रांसोबत अॅडव्हेंचर आणि मस्ती करायची असेल तर पावना लेक हा बेस्ट पर्याय आहे. येथे सूर्योदय आणि सूर्यास्ताचे दृश्य विशेष आकर्षक दिसते.

Dhokla Recipe: घरच्या घरी झटपट बनवा मऊ-स्पॉंजी ढोकळा; फॉलो करा ‘ही’ ट्रिक, वाचा सोपी रेसिपी

Web Title: Best weekend trip destinations lonavala alibaug bhandardara pawna lake near mumbai pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 08:42 PM

Topics:  

  • Maharashtra. Pune
  • travel news
  • Trip

संबंधित बातम्या

Travel News : दोन लोकांच्या बाली ट्रिपसाठी किती खर्च येईल? ट्रिपचा खर्च आणि सर्व तपशील जाणून घ्या
1

Travel News : दोन लोकांच्या बाली ट्रिपसाठी किती खर्च येईल? ट्रिपचा खर्च आणि सर्व तपशील जाणून घ्या

रेल्वेत शाही सफर हवीये? मग सलून कोच तुमच्यासाठी ठरेल परफेक्ट, कोणत्या सुविधा मिळतात ते जाणून घ्या
2

रेल्वेत शाही सफर हवीये? मग सलून कोच तुमच्यासाठी ठरेल परफेक्ट, कोणत्या सुविधा मिळतात ते जाणून घ्या

Travel News : जगातील सर्वात अनोखा एअरपोर्ट, इथे समुद्रकिनाऱ्यावर लँड करते फ्लाईट
3

Travel News : जगातील सर्वात अनोखा एअरपोर्ट, इथे समुद्रकिनाऱ्यावर लँड करते फ्लाईट

Pune Breaking : पुण्यात खळबळ! Passport Office बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर
4

Pune Breaking : पुण्यात खळबळ! Passport Office बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.