chickenpox in children
मुलाच्या आयुष्यातील दुसरे वर्ष त्यांच्या विकासाचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. वयाच्या १२ ते २४ महिन्यांच्या दरम्यान बालकाची रोगप्रतिकारशक्ती विकसित होत असते. आणि प्ले-ग्रुप, डे-केअर, कौटुंबिक स्नेहसंमेलने, प्रवास आणि सार्वजनिक ठिकाणी जाण्यामुळे त्यांचा सामाजिक संवाद वाढत असतो. लहान मुले अधिकाधिक लोकांच्या संपर्कात येतात, तेव्हा संसर्गजन्य आजारांची लागण होण्याचा धोकाही वाढू शकतो. कांजिण्या (चिकनपॉक्स) हा संसर्गजन्य आजार आहे, ज्याकडे पालकांनी विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. नवी मुंबई येथील, मदरहूड हॉस्पिटलचे, निओनॅटॉलॉजी अँड पेडियाट्रिक्स, लीड कन्सल्टंट डॉ. अनिश पिल्लई यांनी कांजिण्यापासून मुलांची कशी काळजी घ्यायची. याबाबतची माहिती सांगितली आहे.
कांजिण्या हा अत्यंत संसर्गजन्य आजार आहे, जो बाधित व्यक्तीच्या जवळच्या संपर्कात आल्याने आणि हवेतील थेंबांद्वारे (ड्रॉपलेट्स) सहज पसरतो. या आजारात सामान्यतः खाज येणारे पुरळ, पाण्याने भरलेले फोड (ब्लिस्टर्स), ताप आणि अस्वस्थता जाणवते . काही केसेसमध्ये यामुळे अंगावर व्रण किंवा डाग राहू शकतात, ज्याचा मानसिक परिणाम हा आजार बरा झाल्यानंतरही दीर्घकाळ टिकून राहू शकतो. कांजिण्यांमुळे दैनंदिन नित्यक्रम देखील विस्कळीत होते, जिथे बरे होईपर्यंत मुलांना डे-केअर आणि इतर सामाजिक क्रियाकलापांपासून दूर राहावे लागते. परिणामी, पालक आणि केअरगिव्हर्सवर देखील याचा परिणाम होतो.बहुतेक मुले या आजारातून पूर्णपणे बरी होत असली, तरी कांजिण्यांमुळे कधी-कधी डिहायड्रेशन, न्यूमोनिया आणि यकृताच्या समस्यांसारख्या गंभीर गुंतागुंती निर्माण होऊ शकतात.

chickenpox in children
याच कारणामुळे पालकांनी आपल्या मुलांचे संरक्षण करण्यासाठी वयानुसार वेळेवर लसीकरण करणे आवश्यक आहे. कांजिण्यांकडे केवळ “लहान मुलांचा सामान्य आजार” म्हणून दुर्लक्ष केले जाऊ नये. हा प्रतिबंध करण्यायोग्य संसर्ग आहे, जो मुलाचे आरोग्य, दैनंदिन नित्यक्रम आणि कौटुंबिक जीवनावर परिणाम करू शकतो. मुलाला संसर्ग होण्याची वाट पाहण्यापेक्षा पालकांनी शिफारस केलेल्या लसीकरणाच्या वेळापत्रकाबाबत पेडियाट्रिशियनशी वेळीच चर्चा करावी.
मुलाला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर पालकांचे लसीकरण करण्याकडे दुर्लक्ष होऊ शकते, विशेषतः मूल निरोगी दिसते आणि डॉक्टरांकडे जाणे कमी होते. दुसऱ्या वर्षात द्यावयाच्या लसींकडे दुर्लक्ष झाल्यास किंवा लस देण्यास उशीर झाल्यास संरक्षणात त्रुटी निर्माण होऊ शकतात. कांजिण्यांसाठी शिफारस केलेले लसीकरण साधारणपणे दोन डोसचे वेळापत्रक असते, ज्यामध्ये पहिला डोस वयाच्या १५ व्या महिन्यात आणि दुसरा डोस १८ व्या महिन्यात दिला जातो.
शिफारस केलेल्या लसीकरणाच्या वेळापत्रकाचे काटेकोर पालन करून पालक लसींद्वारे प्रतिबंध करता येणाऱ्या आजारांपासून मुलांचे रक्षण करण्यास आणि त्यांच्या निरोगी वाढीस व आरोग्यास मदत करू शकतात.
Ans: कांजिण्या हा विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. यावेळी खाज येणारे पुरळ, पाण्याचे फोड आणि ताप येऊ शकतो.
Ans: प्ले-ग्रुप, डे-केअर आणि इतर ठिकाणी अनेक लोकांच्या संपर्कात आल्यामुळे संसर्गाचा धोका वाढू शकतो.
Ans: खाज येणारे पुरळ, पाण्याने भरलेले फोड, ताप आणि अस्वस्थता जाणवणे ही कांजिण्यांची सामान्य लक्षणे आहेत.






