लुईझियानामधील फिरण्याची ठिकाणं (इमेज क्रेडिट: लुईझियाना ऑफिस ऑफ टुरिझम)
लुईझियानाचे मार्डी ग्रास सेलिब्रेशन जगभरात त्यातून दिसून येणारी संस्कृती व परंपरेसाठी, बहारदार कार्यक्रम, कार्निव्हल, पोशाख, थीमनुसार खाद्यपदार्थ आणि अशा विविध गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेत. फ्रान्समधील पारंपरिक ‘बॉफ ग्रा’ रिव्हेरीपासून सुरू झालेला मार्डी ग्रास पुढे वसाहतींमध्ये प्रचलित झाली आणि कालांतराने तिचे आज आपल्याला माहीत असलेल्या प्रसिद्ध फेस्टिव्हलमध्ये रुपांतर झाले. १६९९ मध्ये फ्रेंच- कनेडियन संशोधक जीन-बॅप्टिस्ट ले मोयने डी बिएनविले यांनी न्यू ऑलिन्सजवळील जमिनीच्या तुकड्याचे ‘मार्दी ग्रास पॉइंट’मध्ये रुपांतर करत परिसरात या कार्यक्रमाची सुरुवात केली. १७३० मध्ये मार्दी ग्रास एलिगंट बॉल्स आणि मास्कर्स प्रोसेशन्ससह न्यू ऑलिन्सच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले.
कार्निव्हल सीझन १२ व्या रात्री ६ जानेवारी सुरू झाला आणि २०२५ मधील फेस्टिव्हिटीजची ४ मार्च म्हणजेच फॅट ट्युस्डे किंवा मार्डी ग्रास डे च्या निमित्ताने सांगता झाली. या काळात संपूर्ण राज्य एकत्र येऊन लुईझियानामधील वर्षातला सगळ्यात आनंददायी दिवस साजरा करतं. सगळे जण आपलं कुटुंब व मुलांसह वेगवेगळ्या उपक्रमांचा आनंद घेतं.
ग्रेटर न्यू ऑलिन्स परिसर
स्लाइडेल: न्यू ऑलिन्सच्या पूर्वेला काही मैल गेल्यानंतर जिथे क्रेवे ऑफ बिल्जची बोट परेड स्लाडेल कॅनलमधून जाते. कुटुंबांना सजवलेल्या बोट पाहाताना मजा येईल, जिथे क्रेवे सदस्य बीड्स आणि कार्निव्हल ट्रेझर्स टॉस करतात.
जेफरसन पॅरिशच्या कौटुंबिक अनुभूती देणाऱ्या मार्डी ग्रास अनुभव – फॅमिली ग्रासचा आनंद घ्या. हा मोफत कार्यक्रम सगळ्या कुटुंबाला आनंद देणारा असेल. मार्डी ग्रास परेड्सचा दिमाख, अस्सल स्थानिक खाद्यपदार्थ, स्थानिक कला, किड्स कोर्ट आणि आऊटडोअर राष्ट्रीय कलाकार आणि लुईझियानाच्या लाडक्या कलाकारांचे आउटडोअर कॉन्सर्ट्स यांचा तुम्हाला आनंद घेता येईल.
न्यू ऑलिन्स: फरी फ्रेंड्स अर्थात लाडक्या पाळीव प्राण्यांमुळे मार्डी ग्रासचा हा उत्सव आणखी रंगतदार होतो. न्यू ऑलिन्सचे फ्रेंच क्वार्टर वार्षिक बारकस क्रेवे इथे कुत्री आणि त्यांचे ओनर्स गोड, अतरंगी कपड्यांत सजून येतात. सर्व प्रकारच्या प्राणीप्रेमींसाठी हा कार्यक्रम पर्वणी असतो.
दक्षिण लुईझियाना
लाफायते: लाफायतेमधल्या मार्डी ग्रास फेस्टिव्हिटीज मोठ्या धामधुमीत साजऱ्या केल्या जातात. त्यातले दोन महत्त्वाचे कौटुंबिक सोहळे म्हणजे मुलांची वार्षिक परडे आणि क्रेवे ऑफ बोनापार्ट. मुलांची परडे डाउनटाउन लाफायतेमधून सुरू होईल आणि त्यानंतर संध्याकाळी क्रेवे ऑफ बोनापार्टचा दिमाखदार पद्धतीने प्रारंभ होईल. या फक्त परेड नाहीयेत. जुन्या पद्धतीचे कुरिर दी मार्डी ग्रास व्हर्मिलियनव्हिल येथे होईल आणि त्यानंतर बाकी ठिकाणी त्याचे आयोजन केले जाईल.
युनिस: युनिस, लुईझियाना हे लहान काजुन कंट्री टाउन्सपैकी एक आहे, जिथे संस्कृती आजही असोशीने जपण्यात आलेली आहे आणि कुटुंब हा त्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. म्हणूनच तुम्हाला इथे छोटी मार्डी ग्रास दिसेल, जिथे लहान मुलं वेगवेगळ्या वयोगटांत विभागली जातात आणि पारंपरिक कजुन मार्डी ग्रास परंपरांमध्ये भाग घेतात.
बॅटन रोद: बॅटन रोदमध्ये द मिस्टिक क्रेवे ऑफ मट्स हा धमाल विनोदी कार्यक्रम स्थानिक नॉन- प्रॉफिटद्वारे कुत्र्यांच्या नसबंदीसाठी निधी उभारणीसाठी आयोजित केला जातो. त्यामध्ये आकर्षक कपडे घातलेली कुत्र्याची पिल्लं डाउनटाउन बॅटन रोगमधून परेड करतात. इथे रूचकर खाद्यपदार्थही उपलब्ध असतात. तेव्हा भुकेले या.
लेक चार्ल्सः लेक चार्ल्समध्येही क्रेवे ऑफ बारकस परेड होते, ज्यात पाळीव प्राणी, त्यांचे मालक आणि ज्यांना यात सहभागी होऊन मार्डी ग्रासचा सर्वोत्तम अनुभव घ्यायचा आहे, त्यांना प्रोत्साहन दिलं जातं.
जीनरेटः ग्रँड माराएस मार्डी ग्रास परेडचा अनुभव सगळ्या कुटुंबाला आवडण्यासारखा आहे. हा ग्रामीण मार्डी ग्रास परेड काजुन कंट्रीमध्ये हायवे ९० कॉर्नर आणि जीनरेटच्या कॉलेज रोडवर घेतला जातो. या कौटुंबिक पद्धतीच्या कार्यक्रमात फ्लोट्स, बँड्स आणि ‘अग्ली कॉश्च्युम’ स्पर्धा घेतली जाते, जी चुकवू नये अशी आहे.
दक्षिण लुईझियानामधील होमा आणि थिबोडॉक्स अशी सगळी लहान शहरं अनुभवा, कारण प्रत्येक ठिकाणी कार्निव्हल सीझन साजरा करण्याच्या पद्धती वेगळ्या असतात.
मध्य लुईझियाना
अलेक्झांड्रियाः मुलांना खरी राणी पाहायला घेऊन जायचं आहे का? मिस टीन लुईझियाना ही अलेक्झांड्रियाच्या वार्षिक चिल्ड्रन परेडची ग्रँड मार्शल आहे. तुम्हाला इथं सगळंच्या सगळं कुटुंब अगदी आजी- आजोबा, नातवंडांपासून सगळे जण रंगीत फ्लोट्सपासून स्थानिक मार्चिंग बँड्स, नृत्यापर्यंत बरंच काही दिसेल आणि तुम्हाला त्याचा आनंद घेता येईल.
नॅचिटोचेसः सगळं कुटुंब नॅचिटोचेस इथं क्रेवे ऑफ डायोनिसॉसचा आनंद घेऊ शकतो. इथली संध्याकाळची परेड आकर्षक प्रकाशयोजना, पोशाख आणि घरी घेऊन जाता येणारे भरपूर बीड्स यांमुळे रंगतदार होते.
उत्तर लुईझियाना
मनरोः मनरोमधली क्रेवे ऑफ जानुस परेड डझनभर फ्लोट्स आणि मार्चिंग बँड्ससह शो सादर करते. इथल्या मोठ्या फ्लोट्सवर भव्य स्कल्पचर्स आणि आकर्षक रंगांची उधळण असते, जी नेत्रसुखद असते. त्याचप्रमाणे क्रेवे ऑफ जानुस मुलांच्या परेडमध्येमध्ये धमाल कौटुंबिक उपक्रमांसह सर्वोत्तम फ्लोट्ससाठी स्पर्धा घेतली जाते. मुलांच्या परेडमध्ये तुम्हाला सजावट केलेली भरपूर वॅगन्स व वेगवेगळे कपडे परिधान केलेली मुलं दिसतील.
श्रेव्हपोर्टः श्रेव्हपोर्ट क्रेवे ऑफ बारकस आणि मिऑक्स परेडमध्ये असतं. कुत्र्यांच्या पिल्लांची धमाल पाहायला या आणि तुमची पिल्लं घेऊन यायला विसरू नका. ही गोड परेड तुम्हाला ‘हॅपी मार्डी पॉ’ म्हणायची प्रेरणा देईल.