शरीरावर वाढलेला लठ्ठपणा होईल महिनाभरात कमी! दैनंदिन जीवनात फॉलो करा या सवयी
लठ्ठपणा वाढण्याची कारणे?
लठ्ठपणा कमी करण्यासाठी उपाय?
पोटावरील चरबीचा घेर कमी करण्यासाठी काय करावे?
कधी काळी अख्खा पिझ्झा खाऊनही फारसे कष्ट न घेता आपले वजन पूर्ववत व्हायचे, आठवतात का ते दिवस? पण हाय गेले ते दिन गेले, असे म्हणायची वेळ वाढत्या वयामुळे ओढवली आहे का? आपल्या शरीराच्या मेटाबोलिझमचा एक दर असतो. त्याला बीएमआर म्हटले जाते. आरामाच्या स्थितीत असताना किती ऊर्जा खर्च करतो त्याचे मोजमाप म्हणजे बीएमआर. वाढत्या वयानुसार चयापचयक्रियेचा वेग कमी होतो हे जरी खरे असले तरीही त्याच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न आपण करू शकतो. (फोटो सौजन्य – istock)
आपल्या स्नायूंच्या वजनात तीन किंवा त्यापेक्षा अधिक वजनाची घट व्यायामाच्या अभावी होऊ शकते. कार्डिओ म्हणजे वेगात केले जाणार्या व्यायामामुळे शरीरातील कॅलरीज जळत्तात आणि व्यक्तीला कृतिशील, उत्साही राहाण्यास मदत होते. चालणे, धावणे आणि सायकल चालवणे अशा प्रकारातील व्यायाम तीस मिनिटे करावा. त्यामुळे सर्वांगाचा व्यायाम होतो. हळूहळू वेळ वाढवल्यास स्टॅमिना आणि सहनशक्ती दोन्हीतही वाढ होते.
आपल्या बीएमआर आणि एकूण आरोग्यावर अतिताणाचा परिणाम होत असतो. तणाव असताना कॉर्टिसोल नावाचे संप्रेरक आपल्या भुकेची जाणीव वाढवतात आणि तृप्ततेची भावना येऊ देत नाहीत. वाढते वय असले तरीही यामुळे चयापचय क्रियेत अडथळे निर्माण होतात, त्यासाठी ध्यानधारणा खूप मदत करू शकते. ध्यानधारणा केल्याने लक्ष केंद्रीत करणे सहज शक्य होते. आपला ताबा तणावाने घेण्याआधीच ध्यानधारणेने तणावाला आपल्या काबूत करण्याचा प्रयत्न करायला हवा.
कोणत्यातरी चुकीच्या डाएटच्या नादी लागू नये. आरोग्यदृष्ट्या योग्य आहार घ्यावा. आपल्या जीवनशैलीत आहाराती चदल करावेत, पण झटपट डाएटच्या नादी लागू नये. चुकीच्या पद्धतीने केलेल्या डाएटमुळे वजन पटकन कमी होईल मात्र आपल्या चयापचय क्रियेवर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो. फक्त वजन कमी करून नाही तर चरबीचे प्रमाण कमी केल्याने प्रथिनांचे प्रमाण वाढवा आपली शारीरिक हालचाल जितकी अधिक होईल तितका प्रथिनयुक्त आहाराचे प्रमाण वाढवा, अनेकदा म्हातारपणी व्यक्ती स्थूल होतात कारण त्यांच्या स्नायूंचे वजन कमी होते आणि चरबीचे प्रमाण वाढते. आहारातील प्रथिनाचे प्रमाण वाढल्यास स्नायूंची वाढ होते आणि पेशींचे स्वास्थ वाढते.
हाय इन्टेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिग किवा उच्च क्षमतेच्या ताकदीच्या व्यायामांमध्ये मिनिटागणिक दुप्पट किया तिप्पट उष्मांक खर्च होतात. तेच कार्डियो प्रकारात हे प्रमाण कमी असते. ताकदीच्या किवा वजन उचलण्याचा व्यायाम संपल्यावरही शरीरातील उष्मांक काही काळ जळत राहतात.
स्नायूंच्या वृद्धी आणि चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप ही खूप अधिक महत्वाची असते. मानवाला आठ तासांची झोप गरजेची आणि पुरेशी असते. मात्र, अनेकांना आठ तास झोप मिळत नाही. अपुर्या झोपेमुळे शरीरात चरबी साठण्याचे प्रमाण वाढते. तसे चरबी कमी होण्याचा वेगही कमी होतो. त्यामुळे पुरेशी झोप आवश्यक आहेच पण जेवल्या जेवल्या लगेचच झोपू नये, हे देखील खरेच आहे. कारण जेवण पचण्यास काही कालावधी लागत असतो.
आपल्याला बीएमआर व्यवस्थित ठेवायचा असेल तर सर्वात सोपा उपाय म्हणजे पाणी पिणे, सकाळी उठल्या उठल्या पाणी पिणे ही चरबी वितवळ्याच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट आहे. पाणी प्यायल्याने ताजेतवाने वाटतेच तसेच चरबी कमी होण्यासही मदत होते. पाण्याशिवाय फळांचा रस किंवा औषधी वनस्पती टाकलेले पाणीही नक्कीच चांगला पर्याय आहे.






