अंघोळ करण्यात पाण्यात टाका 'हा' पांढरा पदार्थ
जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना मिठाचा वापर केला जातो. मिठाशिवाय पदार्थाला चव लागत नाही. मीठ केवळ जेवणापुरतेच नाहीतर संपूर्ण शरीरासाठी प्रभावी आहे. याशिवाय मीठ खाल्ल्यामुळे शरीराला सुद्धा अनेक फायदे होतात. बऱ्याचदा धावपळीच्या जीवनशैलीमुळे शरीरात अशक्तपणा वाढू लागतो. तर काहीवेळा मानसिक तणाव वाढल्यामुळे शरीरात अनेक बदल दिसून येतात. उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये अंगाला आलेल्या घामामुळे चेहऱ्यावर तेलकट किंवा चिकट थर जमा होऊ लागतो. यामुळे फँगल इन्फेक्शन होणे, त्वचा लाल होणे किंवा चेहऱ्यावर रॅश येऊन त्वचेची गुणवत्ता खराब होऊन जाते. अशावेळी अंघोळ करताना पाण्यात मीठ टाकल्यास शरीरात अनेक बदल दिसून येतील. आठवडाभर नियमित अंघोळीच्या पाण्यात मीठ टाकून अंघोळ केल्यास मानसिक तणाव कमी होण्यासोबतच शरीराला अनेक फायदे होतील. जाणून घ्या मिठाच्या पाण्याने अंघोळ करण्याचे फायदे.(फोटो सौजन्य – istock)
बऱ्याचदा घाणीमुळे चेहऱ्यावर पिंपल्स किंवा मुरुमांचे फोड येतात. हे फोड त्वचा पूर्णपणे खराब करून टाकतात. त्यामुळे त्वचेवरील डाग स्वच्छ करण्यासाठी मिठाच्या पाण्याने त्वचा स्वच्छ करावी. यामध्ये मॅग्नेशिअम, सोडियम आणि कॅल्शिअमसारख्या मिनरल्स मोठ्या प्रमाणात आढळून येतात, ज्यामुळे इन्फेक्शनपासून त्वचेचा बचाव होतो. चेहऱ्यावर वाढलेले फंगल इन्फेक्शन कमी करण्यासाठी मिठाच्या पाण्याने चेहरा स्वच्छ करून घ्यावा. आठवडाभर नियमित मिठाच्या पाण्याने चेहरा स्वच्छ केल्यास त्वचा अतिशय चमकदार होईल. तसेच त्वचेचा रंग सुद्धा उजळदार दिसेल.
बऱ्याचदा धूळ, माती आणि घामामुळे केसांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोंडा होतो आणि केसांमध्ये खाज येणे, टाळूवरील इन्फेक्शन किंवा फंगल इन्फेक्शन वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे आठवड्यातून एकदा मिठाच्या पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्यावे. मीठ शरीरसोबतच त्वचा आणि केस स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. यामुळे केसांमधील बॅक्टरीया कमी होतात.
शरीरात वाढलेल्या मानसिक तणावामुळे झोपेची गुणवत्ता पूर्णपणे खराब होऊन जाते. झोप न येणे, झोपल्यानंतर अचानक जाग येणे, डोकेदुखी इत्यादी लक्षणे शरीरात दिसू लागल्यास मन शांत ठेवण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात मीठ टाकून अंघोळ करावीत. मानसिक तणाव कमी करण्यासाठी मिठाच्या पाण्याने नियमित अंघोळ करा.
मिठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे
मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने स्नायूंना आराम मिळतो आणि ताण कमी होतो. विशेषतः एप्सम सॉल्ट (मॅग्नेशियम सल्फेट) वापरल्याने स्नायू आणि मज्जासंस्थेतील वेदना कमी होण्यास मदत होते.
मिठाच्या पाण्याने आंघोळ कशी करावी?
एका बादलीत कोमट पाणी घ्या आणि त्यात चमचाभर मीठ मिसळा. आंघोळ करण्यापूर्वी हे पाणी वापरा किंवा गरम पाण्यात मीठ मिसळून आंघोळ करा.तुम्ही यासाठी एप्सम सॉल्टचा वापर करू शकता, जे साध्या मिठापेक्षा वेगळे आहे आणि विशेषतः स्नायूंसाठी फायदेशीर आहे.