डोकेदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी या चहाचे करा सेवन
राज्यभरात सगळीकडे थंडी वाढल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्याची जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. कारण या दिवसांमध्ये साथीचे आजार मोठ्या प्रमाणावर सगळीकडे पसरू लागतात. सतत सर्दी, खोकला किंवा ताप वाढू लागल्यामुळे आरोग्य बिघडून जाते. थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यात प्रामुख्याने उद्भवणारी समस्या म्हणजे सतत डोकं दुखणे. डोकं दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर काय करावे हे अनेकदा सुचत नाही. वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे तीव्र डोके दुखी होण्यास सुरुवात होते. अशावेळी अनेक लोक पेनकिलरच्या गोळ्या घेतात. पण सतत पेनकिलरच्या गोळ्या खाणे आरोग्यासाठी घातक आहे.(फोटो सौजन्य-istock)
लाईफ स्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
डोके दुखीची समस्या उद्भवल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे आवश्यक आहे. तसेच डोकं दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर पेनकिलरच्या गोळ्या घेण्याऐवजी घरगुती उपाय करून पाहावे, यामुळे लवकर आराम मिळतो. हिवाळ्यात डोकं दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर चहाचे सेवन करावे. चहा प्यायल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. आलं, वेलची, लवंग, दालचिनी इत्यादी मसाल्यांचा वापर करून बनवलेला चहा आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. या चहामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म आरोग्य सुधारण्यास मदत करतात.
थंडीच्या दिवसांमध्ये डोकं दुखीची समस्या उद्भवू लागल्यास मसाल्याच्या चहाचे सेवन करावे. यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. डोकं दुखी दूर करण्यासाठी चहा बनवताना त्यात तुळशीची पाने, लवंग आणि काळी मिरी घालून चहा तयार करावा. या मसाल्यांमध्ये असलेले गुणधर्म डोके दुखीच्या समस्येपासून आराम मिळवून देण्यास मदत करतात. घसा दुखणे, सर्दी खोकला इत्यादी समस्यांपासून आराम मिळवून देण्यास मसाल्याचा चहा मदत करतो.
हिवाळ्यामध्ये डोकं दुखीची समस्या उद्भवू लागल्यास लवंग आणि गुळाच्या चहाचे सेवन करावे. यामुळे तात्काळ डोके दुखीपासून आराम मिळतो. शरीरातील उबदारपणा कायम टिकवून ठेवण्यासाठी लवंग गुळाचे सेवन करावे. या चहामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म त्वचेला संसर्ग आणि जळजळ होण्यापासून बचाव करतात. त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी गूळ लवंगचा चहाचे सेवन करावे.
लाईफ स्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
थंडीच्या दिवसांमध्ये सर्दी, खोकला, ताप इत्यादी समस्या सतत उद्भवतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी मसाल्याच्या चहाचे सेवन करावे. हा चहा बनवताना साखरेचा वापर करण्याऐवजी गुळाच्या चहाचे सेवन करावे. ज्यामुळे आरोग्याला फायदे होतील. गुळाच्या चहामध्ये असलेली लवंग, दालचिनी, आलं, तुळस आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहेत. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स सर्दी, खोकला, ताप आणि साथीच्या आजारांपासून बचाव करण्यास मदत करतात.