वजन कमी करण्यासाठी प्रभावी पेय
हल्लीच्या काळात वाढलेले वजन ही सामान्य समस्या झाली आहे. वजन वाढल्यानंतर आरोग्यावर गंभीर परिणाम दिसून येतात. याशिवाय अनेक आजार होण्याची शक्यता असते. वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी महिला आणि पुरुष सतत काहींना काही करत असतात. मात्र तरीसुद्धा फारसा परिणाम दिसून येत नाही. शरीरावर वाढलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी आहार तज्ज्ञांकडून डाईट घेणे, तासनतास जिममध्ये जाऊन वर्कआऊट करणे इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. मात्र तरीसुद्धा वाढलेले वजन कमी होत नाही.(फोटो सौजन्य – iStock)
वजन वाढल्यानंतर मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल इत्यादी अनेक गंभीर समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे दैनंदिन आहारात चुकीच्या सवयी फॉलो न करता शरीराला पचन होईल अशा गुणकारी पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला पोटावर वाढलेली अतिरिक्त चरबी आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी उपाशी पोटी कोणत्या पाण्याचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. घरगुती उपाय केल्यामुळे पोटावर वाढलेली चरबी कमी होऊन जाते.
वजन कमी करण्यासाठी दैनंदिन आहारात चुकीच्या पदार्थांचे सेवन करण्याऐवजी शरीराला पचन होईल अशा पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. यासाठी अर्धा लिटर पाणी गरम करून घ्या. पाणी गरम झाल्यानंतर त्यात ओवा आणि बडीशेप टाकून व्यवस्थित उकळवा. त्यानंतर त्यात हळद आणि धणे घालून उकळवून घ्या. 15 ते 20 मिनिटं काढा व्यवस्थित उकळल्यानंतर गॅस बंद करून काढा गाळून घ्या. काढ्यामध्ये तुम्ही मध टाकून पिऊ शकता. यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील आणि वाढलेले वजन कमी होईल.
थंडीसह इतर सर्वच ऋतूंमध्ये काढ्याचे नियमित सेवन करावे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. काढा प्यायल्यामुळे शरीराचे चयापचय सुधारते. याशिवाय शरीरावर वाढलेली अतिरिक्त चरबी जळून जाते. तसेच बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी नियमित काढ्याचे किंवा ओव्याचे सेवन करावे. उपाशी पोटी ओवा बडीशेपचे पाणी प्यायल्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातील.
ओवा, बडीशेप आणि हळदीच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे पोटावर वाढलेली चरबी कमी होईल. याशिवाय शरीराला अनेक फायदे होतील. पोटाच्या आजूबाजूला किंवा हातांवर वाढलेल्या अतिरिक्त चरबीमुळे महिलांचा आत्मविश्वास काहीवेळा कमी होऊन जातो. त्यामुळे वाढलेली चरबी कमी करण्यासाठी इतर कोणतेही उपाय करण्याऐवजी घरगुती उपाय करावे.
शरीरात साचून राहिलेले विषारी घटक आरोग्यासाठी अतिशय घातक आहेत. हे पदार्थ शरीरात साचून राहिल्यामुळे रक्त शुद्ध होण्यामध्ये अडथळा निर्माण होतो. त्याचा परिणाम हृदय आणि किडनीच्या आरोग्यावर होण्याची शक्यता असते. अशावेळी शरीर डिटॉक्स करण्यासाठी कोणत्याही इतर पेयांचे सेवन करण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करून काढा तयार करावा.