बर्ड फ्लूची शरीरात दिसून येणारी लक्षणे
कोरोना महामारीनंतर राज्यासह देशभरात सगळीकडे वेगवेगळ्या विष्णूंनी थैमान घातले आहे. कोणत्याही विषाणूची लागण झाल्यानंतर सुरुवात दिवसांमध्ये शरीरात सामान्य लक्षणे दिसून येतात. मात्र कालांतराने शरीरातील लक्षणे गंभीर झाल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करणे आवश्यक आहे. राज्यभरात सगळीकडे बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे पशु विभागाकडून हाय अलर्ट देण्यात आला आहे. बर्ड फ्लू हा आजार प्रामुख्याने प्राण्यांमध्ये दिसून येतो. मात्र बर्ड फ्लू झालेल्या प्रांण्यांचे मास खाल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य – iStock)
H5 N 1, H7 N 9 हे नव्याने आढळून आलेले विषाणू नाक आणि तोंडाद्वारे शरीरात प्रवेश करतो. यामुळे सुरुवातीच्या दिवसांमध्ये बर्ड फ्लूची कोणतीचं लक्षणे शरीरात दिसून येत नाही. पक्षी किंवा प्राण्यांना झालेल्या संसर्गामुळे मानवाला हा आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला बर्ड फ्लू झाल्यानंतर कशी लक्षणे ओळखावी? बर्ड फ्लूची लक्षणे काय याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
बर्ड फ्लू हा प्रामुख्याने प्राणी आणि पक्ष्यांमध्ये दिसून येतो. मात्र हल्ली मानवी शरीरात सुद्धा या विषाणूची लक्षणे दिसून येत आहेत. बर्ड फ्लूचा प्रसार कोंबड्या टर्की मोर किंवा इतर पक्षांमुळे होण्याची शक्यता असते. H5 N1 , H 5N 9 , H 5N8 या नवीन आढळलेल्या विषाणूमुळे डोळे कान आणि तोंडाद्वारे या विषाणूची लागण होत आहे.
नसांमध्ये साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल कायमचे होईल कमी! नियमित करा ‘या’ पांढऱ्या पदार्थाचे सेवन
बर्ड फ्लू होऊ नये म्हणून आरोग्याची योग्य प्रकारे काळजी घेणे आवश्यक आहे. याशिवाय जंगली प्राणी आणि पक्षांपासून दूर राहणे. यामुळे संसर्ग होण्याची शक्यता असते. शरीरात बर्ड फ्लूची कोणतीही लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करून आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी. तसेच बर्ड फ्लू झालेल्या व्यक्तीपासून दूर राहावे, अन्यथा हा आजार हवे मार्फत नाक आणि तोंडात प्रवेश करू शकतो.