ता : 13 – 6 – 2023 मंगळवार
तिथी – संवत्सर
मिती 23, शके 1945, विक्रम संवत 2080, उत्तरायण उन्हाळा, आषाढ कृष्ण पक्ष दशमी 9:28, नंतर एकादशी,
सूर्योदय – 5:43 सूर्यास्त – 7:01
सूर्योदय नक्षत्र – रेवती 13:31, योग – सौभाग्य 5:54, शोभन 28:17 नंतर, करण – विष्टी 9:28, बाव 21:05 नंतर, बालव नंतर,
केतू – तूळ
राहु काळ – दुपारी 3:00 ते 4:30 पर्यंत
शुभ रंग – गडद किंवा गुलाबी लाल
शुभ अंक – 9, 3, 6
शुभ रत्न- मंगळासाठी कोरल
१३ जून घटना
२०१८: फोक्सवॅगन – कंपनीला उत्सर्जन (Emission) घोटाळ्यासाठी एक अब्ज युरो (8190 करोड)चा दंड ठोठावण्यात आला आहे.
२००७: अल अस्कारी मशिद, इराक – दुसऱ्यांदा बॉम्बस्फोट हल्ला झाला.
२००५: मायकेल जॅक्सन – यांना १९९३ मध्ये एका मुलाचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपातून दोषमुक्तता.
२००२: अँटी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र करार – या करारातून अमेरिकेची माघार.
२०००: विश्वनाथन आनंद – स्पेन मधील माद्रिद येथे एकाच वेळी १५ स्पर्धकांविरुद्ध खेळताना ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याने बारा लढतीत विजय मिळविला.
१९९७: दक्षिण दिल्लीतील उपहार सिनेमागृहाला लागलेल्या आगीत ५९ जण मृत्युमुखी पडले, तर सुमारे १०० जण जखमी झाले.
१९८३: पायोनियर १० – हे अंतराळयान सूर्यमाला सोडून जाणारी पहिली मानवनिर्मित वस्तू ठरली.
१९७८: इस्त्रायली सैन्याने लेबनॉनमधुन माघार घेतली.
१९५६: पहिली युरोपियन चॅम्पियन कप फूटबॉल स्पर्धा रियल माद्रिदने जिंकली.
१९४४: दुसरे महायुद्ध – जर्मन फौजांनी वापरलेला पहिला फ्लाईंग बॉब लंडनवर आदळला.
१९४४: दुसरे महायुद्ध – व्हिलर्स-बोकेजची लढाई: जर्मनीच्या मायकेल विटमन यांनी ब्रिटिश सेनेचे १४ रणगाडे, १५ ट्रक आणि २ अँटी-टॅंक गन्स उध्वस्त केल्या.
१९४४: दुसरे महायुद्ध – जर्मनीने इंग्लंडवर पहिला V1 फ्लाइंग बॉम्ब हल्ला केला.
१९३४: व्हेनिसमध्ये ऍडॉल्फ हिटलर आणि बेनिटो मुसोलिनी यांची भेट.
१८८६: कॅनडा – देशातील व्हॅनकूवर शहर आगीत बेचिराख.
१९९४: दीपिका कुमारी – भारतीय तिरंदाज – पद्मश्री
१९६५: मनिंदर सिंग – भारतीय क्रिकेटपटू
१९६४: पीयूष गोयल – भारतीय राजकारणी आणि कॅबिनेट मंत्री
१९३७: आंद्रेस व्हिटॅम स्मिथ – द इंडिपेंडंटचे सहसंस्थापक
१९२८: जॉन फोर्ब्स नॅश ज्युनियर – अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक – नोबेल पारितोषिक (निधन: २३ मे २०१५)
१९२३: प्रेम धवन – भारतीय गीतकार – पद्मश्री (निधन: ७ मे २००१)
१९०९: इ. एम. एस. नंबूदिरिपाद – केरळचे १ले मुख्यमंत्री (निधन: १९ मार्च १९९८)
१९०५: कुमार श्री दुलीपसिंहजी – इंग्लंडचे क्रिकेटपटू (निधन: ५ डिसेंबर १९५९)
१८७९: बाबाराव सावरकर – अभिनव भारत संघटनेचे संस्थापक (निधन: १६ मार्च १९४५)
१८३१: जेम्सक्लार्क मॅक्सवेल – ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक व गणितज्ञ, प्रकाश हा विद्युत चुंबकीय तरंगांनी बनतो, असा सिद्धांत मांडणारे (निधन: ५ नोव्हेंबर १८७९)
१८२२: कार्ल श्मिट – जर्मन रसायनशास्त्रज्ञ (निधन: ११ मार्च १८९४)
२०२२: हरी चंद – भारतीय धावपटू – आशियाई गेम्स सुवर्ण पदक (जन्म: १ एप्रिल १९५३)
२०२२: शुभोमय चटर्जी – बंगाली कलाकार
२०२०: वसंत नायसादराय रायजी – भारतीय क्रिकेटपटू आणि क्रिकेट इतिहासकार (जन्म: २६ जानेवारी १९२०)
२०१३: डेव्हिड ड्यूईश – ड्यूईश इंक. कंपनीचे संस्थापक
२०१२: मेंहदी हसन – पाकिस्तानी गझलगायक गझलसम्राट (जन्म: १८ जुलै १९२७)
१९६९: आचार्य अत्रे – मराठी विनोदी लेखक (जन्म: १३ ऑगस्ट १८९८)
१९६९: प्रल्हाद केशव अत्रे – विनोदी लेखक, पत्रकार, शिक्षणशास्त्रज्ञ, राजकारणी (जन्म: १३ ऑगस्ट १८९८)
१९६९: क्लेरेन्स 13X – अमेरिकन धार्मिक नेता, नेशन ऑफ गॉड्स अँड अर्थ्सचे संस्थापक (जन्म: २२ फेब्रुवारी १९२८)
१९६७: विनायक पांडुरंग करमरकर – भारतीय शिल्पकार – पद्मश्री (जन्म: २ ऑक्टोबर १८९१)