मराठमोळे गायक, अभिनेता, संगीतकार मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या २९ डिसेंबर रोजीचा इतिहास (फोटो सौजन्य: नवराष्ट्र टीम)
आज मराठमोळे गायक, अभिनेते, संगीतकार मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा जन्मदिवस. ते आपल्या अस्खलित वाणी, अद्वितीय गळा आणि तल्लख बुद्धीसाठी ओळखले जातात. ते बाबा माशेलकर यांचे शिष्य होते. १९१४ मध्ये साली बालगंधर्वांनी गंधर्व नाट मंडळी नावाची संस्था सुरु केली होती. किर्लोस्करांनी गंधर्व नाटक मंडळीची ओळख दीनानाथ मंगेशकरांनी करुन दिली होती. त्यांनी बलवंत संगीत नाटक मंडळाची स्थापना करुन मराठी रंगभूमीवर आपल्या गायनाने आणि अभिनयाने ठसा उमटवला. त्यांनी चित्रपटसृष्टीतही काम केले आहे. लता मंगेशकर, आशा भोसले, मीना खाडेकर, उषा मंगेशक आणि हृदयनाथ मंगेशकर या महान कलाकारांचे ते वडील होते. त्यांच्या स्मरणार्थ सांस्कृतिक पंरपरा पुढे नेण्यासाठी लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान केला जातो.
29 डिसेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
29 डिसेंबर रोजी जन्म दिनविशेष






