श्रावण महिन्यात चुकूनही करू नका 'या' पदार्थांचे सेवन
श्रावण महिना सणांचा महिना म्हणून ओळखला जातो. कारण या महिन्यात भगवान शंकराची पूजा, व्रत, उपवास केले जातात. तसेच सगळीकडे आनंदाचे आणि भक्तिमय वातावरण असते. तसेच श्रावण महिन्याला धार्मिक महत्व असल्यामुळे या महिन्यात मांसाहारी पदार्थांचे सेवन केले जात नाही. अनेक नियम आणि बंधन पाळली जातात. श्रावण महिन्यात दूध, दही, भाज्या इत्यादी अनेक गोष्टींचे सेवन केले जात नाही. आजी आजोबांच्या काळात पाळले गेलेले नियम अजून फॉलो केले जात आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला श्रावण महिन्यात कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये? यामागील धार्मिक आणि वैज्ञानिक कारण काय? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
श्रावण महिन्याला सुरुवात झाल्यानंतर सगळीकडे हलकासा पाऊस असतो. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पालेभाज्यांचे सेवन केले जात नाही. कारण वातावरणात असलेल्या आर्द्रतेचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. पावसाळ्यात भाज्यांवर लगेच बुरशी, जीवाणू आणि इतर संसर्गजन्य घटक हवेमार्फत अन्नपदार्थांवर चिटकून बसतात. विषाणूजन्य भाज्यांचे सेवन केल्यामुळे पोटासंबंधित समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे बाजारात दिसणारी ताजी भाजी प्रत्यक्षात संक्रमित असण्याची जास्त शक्यता असते. तसेच या दिवसांमध्ये वांगी खाऊ नयेत. कारण वांगी पचनासाठी अतिशय जड असतात. याशिवाय वांग्याचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया बिघडण्याची जास्त शक्यता असते.
श्रावण महिन्यात अनेक लोक उपवास करतात. पण या दिवसांमध्ये दूध, दही, ताक किंवा रायता खाल्ला जात नाही. कारण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये गाई , घरातील गुरे बाहेर चरण्यासाठी जातात. चारा खाताना त्यांच्या पोटात बुरशी किंवा कीटक जातात, ज्यामुळे दुधाच्या गुणवत्तेवर गंभीर परिणाम होण्याची जास्त शक्यता असते. दूषित दूध पचन होण्यासाठी जास्तीचा वेळ लागतो. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये दूध, दही इत्यादी पदार्थांचे सेवन करू नये. संक्रमित दुधाचे सेवन केल्यामुळे अपचन, गॅस किंवा अॅसिडिटी होण्याची शक्यता असते.
बाळाला जन्म देण्यासाठी पुरुषांचा Sperm Count किती पाहिजे, कशी करावी तपासणी
पूर्वीच्या काळी केवळ पथ्य म्हणूनच नाहीतर आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी सुद्धा पथ्य पाळले जाते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराची रोगप्रतिकारशक्ती अतिशय कमकुवत होऊन जाते. त्यामुळे संक्रमित भाज्या आणि दूध दह्याचे सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो. म्हणूनच श्रावण महिन्यात हलका, ताजा आणि पचायला सोपा आहार घेण्याचा सल्ला दिला जातो.