लग्नसराईच्या दिवसांना सुरुवात झाली आहे. लग्नाच्या काही महिने आधीपासून लग्नाची तयारी केली जाते. लग्न ठरल्यानंतर नवरीच्या साड्या, कपडे इत्यादी अनेक गोष्टी खरेदी केल्या जातात. याशिवाय नवरीच्या चेहऱ्यावर चमकदार ग्लो येण्यासाठी वेगवेगळ्या स्किन ट्रीटमेंट करून घेतल्या जातात. पण वारंवार केलेल्या स्किन ट्रीटमेंटमुळे ऐन लग्नाच्या आधी त्वचा खराब होऊन जाते. पण लग्नाच्या आधी कोणत्याही स्किन ट्रीटमेंट करण्याआधी आहारात बदल करावे. आहारात केलेल्या बदलांमुळे त्वचेवर चमकदार ग्लो येतो. आहारात केलेल्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. (फोटो सौजन्य – istock)
लग्नाआधी चेहऱ्यावर येईल ब्रायडल ग्लो! आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश, आठवडाभरात त्वचेवर येईल नैसर्गिक ग्लो

सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात चिया सीड्स मिक्स करून प्यावेत. चिया सीड्सचे पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि त्वचेवरील कोरडेपणा कमी होतो.

उपवासाच्या दिवशी कायमच रताळी खाल्ली जातात. रताळी खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. यामध्ये असलेले बीटा कॅरोटीन त्वचा निरोगी, नितळ आणि चमकदार ठेवण्यास मदत करते.

जेवणातील अनेक वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी टोमॅटोचा वापर केला जातो. टोमॅटोमध्ये असलेले गुणकारी घटक चेहऱ्यावरील डेड स्किन कायमची नष्ट करतात.

सकाळी उठल्यानंतर नियमित ग्रीन टी प्यायल्यास शरीरातील घाण बाहेर पडून जाते आणि आरोग्य सुधारते. नियमित ग्रीन प्यायल्यास संपूर्ण शरीर डिटॉक्स होईल.

डार्क चॉकलेट खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी तुम्ही डार्क चॉकलेटचे सेवन करू शकता. यामध्ये ७० टक्क्यांपेक्षाही जास्त कोको पावडर असते, ज्यामुळे चेहऱ्यावरील डलपणा कमी होतो.






