धार्मिक दृष्ट्या हा महिना अतिशय महत्त्वाचाआहे. या महिन्यात सण-उत्सव, व्रत, पूजा विधीची रेलचेल असते. भगवान भोलेनाथांना श्रावण महिना अतिशय प्रिय आहे. या महिन्यात शिवभक्त भगवान शिवला प्रसन्न करण्यासाठी उपासना (Shrawan Pooja Vidhi) करत आहेत. या महिन्यात भगवान शिव प्रसन्न मुद्रेत असतात. परंतु या महिन्यात जर तुम्ही उपासना आणि व्रतासह काही उपाय केले तर ते तुमच्या जीवनाशी संबंधित सर्व समस्या आणि वास्तुदोष (Vastu Tips) दूर होण्यास मदत होते. त्यानुसार जाणून घेऊया श्रावण महिन्यातील उपायांसंदर्भात माहिती.
गृहकलह टाळण्यासाठी
वास्तुदोषांमुळे घरात अशांततेचे वातावरण असते. अशा स्थितीत घरातील संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि गृहकलह टाळण्यासाठी श्रावण महिन्यातील सोमवारी घराच्या ईशान्य कोपर्यात रुद्राभिषेक करावा.
प्रगतीसाठी
घरामध्ये वास्तुदोष असल्यास घरातील सदस्यांची प्रगती थांबते. हा दोष दूर करण्यासाठी सोमवारी शमीचे रोप घराच्या प्रवेशद्वारावर लावा आणि झाडाला नियमित पाणी द्या. यामुळे वास्तुदोष दूर होतो आणि घरातील लोकांची प्रगती होईल.
धन लाभासाठी
श्रावण महिन्यात घराच्या पूर्व दिशेला वेलीचे रोप लावावे. रोज सकाळ संध्याकाळ या वेलीला पाणी अर्पण करून तुपाचा दिवा लावावा. असे केल्याने गरिबी आणि आर्थिक संकट दूर होते आणि धनलाभ होतो.
विवाहसाठी
विवाहात अडथळे येत असतील किंवा कोणत्याही कारणाने विलंब होत असेल तर श्रावण महिन्यात कुमारी मुलीने घराच्या उत्तर दिशेला तुळशीचे रोप लावावे. असे केल्याने विवाहाची शक्यता लवकर निर्माण होते.
वास्तुदोष निवारणासाठी
घरात वास्तुदोष असल्यास श्रावण महिन्यात शिवलिंग घरी आणून त्याची नित्य पूजा केल्यास वास्तुदोष दूर होतो. या उपायाने घरात सुख समृद्धी नांदते.