कायमच महागड्या क्रीम वापरता? मग 'या' पद्धतीने करा संत्र्याच्या सालीचा वापर, चेहऱ्यावर येईल जादुई चमक
चेहऱ्यावर आलेले पिंपल्स, काळे डाग, मुरूम, सुरकुत्या, ऍक्ने घालवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. फेसपॅक, फेसमास्क, फेशिअल, क्लीनअप इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. त्वचेची काळजी घेण्यासाठी वारंवार केमिकल स्किन ट्रीटमेंट, बोटॉक्स इत्यादी वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून त्वचा सुंदर आणि चमकदार केली जाते. पण याचा परिणाम फार काळ चेहऱ्यावर टिकून राहत नाही. वारंवार केमिकल प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे काही काळानंतर त्वचा सैल पडून जाते. त्वचेला वरून पोषण देण्यासोबतच आतून पोषण देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. अन्यथा त्वचेवरील नैसर्गिक चमक वाढत नाही. त्वचा कायमच चमकदार किंवा सुंदर हवी असेल तर आहारात विटामिन सी युक्त पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला संत्र्याच्या सालीचा वापर कशा पद्धतीने करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. संत्र्याच्या सालीचा वापर केल्यामुळे चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक वाढण्यास मदत होते.(फोटो सौजन्य – istock)
त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. पण नैसर्गिक उपाय केल्यास त्वचा अतिशय सुंदर आणि चमकदार होण्यास मदत होईल. चेहऱ्यावर आलेले काळे डाग घालण्यासाठी संत्र्याच्या सालीपासून बनवलेल्या सीरमचा वापर करावा. रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर नियमित संत्र्याचे सीरम लावल्यास महिनाभरात त्वचा उजळदार होईल आणि चेहऱ्यावर आलेले काळे डाग कमी होण्यास मदत होईल. संत्र्याच्या सालीमध्ये विटामीन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स गुणधर्म आढळून येतात. यामुळे पिगमेंटेशन आणि सूर्याच्या अतिनील किरणांमुळे झालेले त्वचेचे नुकसान भरून निघते. चला तर जाणून घेऊया फेस सीरम बनवण्याची कृती.
संत्र्याच्या सालीमध्ये असलेल्या नैसर्गिक तेलामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. सीरम बनवण्यासाठी संत्री, लिंबू आणि पपईच्या सालीचा वापर करावा. यासाठी टोपात पाणी गरम करून त्यात संत्री, लिंबू आणि पपईच्या साल टाकून उकळवून घ्या. सालीचा अर्क पाण्यात उतरल्यानंतर गॅस बंद करुन पाणी गाळून घ्या. त्यानंतर पाण्यात कोरफडीचा गर, बदाम तेल, ग्लिसरीन आणि विटामिन ई कॅप्सूल घालून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेले सीरम त्वचेसाठी नैसर्गिक स्किन बूस्टर म्हणून काम करेल. संत्र्याच्या सालीपासून बनवलेले सीरम फ्रिजमध्ये दोन आठवड्यांपर्यंत व्यवस्थित टिकून राहील.
Skin Care Mistakes: स्किनकेअरमध्ये ‘या’ चुका करताय? आजच टाळा, नाहीतर त्वचेचे होईल मोठे नुकसान
संत्र्याच्या सालीपासून बनवलेले सीरम नियमित चेहऱ्यावर लावल्यास त्वचा चमकदार होईल. तसेच त्वचेतील कोलेजन वाढण्यास मदत होईल. अकाली येणाऱ्या सुरकुत्या कमी करण्यासाठी विटामिन सी युक्त संत्र्याच्या सालीपासून बनवलेल्या सीरमचा वापर करावा. हे सीरम त्वचेच्या पेशींचे पुनरुज्जीवन करण्यास मदत करतात. उन्हामुळे काळवंडलेली त्वचा पुन्हा उजळदार करण्यासाठी आणि मृत त्वचा काढून टाकण्यासाठी पपईच्या सालीतील एन्झाइम्स फायदेशीर ठरतील.






