शरीरात वाढलेल्या पित्तामुळे सतत आंबट ढेकर येतात? मग 'या' पद्धतीने करा आल्याचे सेवन
प्रत्येक स्वयंपाक घरात अनेक औषधी पदार्थ उपलब्ध असतात. त्यातील अतिशय गुणकारी आणि शरीरासाठी प्रभावी ठरणारा पदार्थ म्हणजे आलं. आल्याचा वापर जेवणातील अनेक वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. यासोबतच ज्यूस किंवा कोणतेही औषध तयार करताना आल्याचा वापर केला जातो. आल्यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म शरीरासाठी फायदेशीर ठरतात.चहा बनवताना प्रामुख्याने आल्याचा वापर केला जातो. आल्यामध्ये असलेल्या तिखटपणामुळे चहाची चव आणि सुगंध वाढतो. चहाच्या सेवनामुळे झोप लगेच उडून जाते आणि काम करण्याचा उत्साह निर्माण होतो. पण बऱ्याचदा आहारात होणाऱ्या बदलांमुळे आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे शरीराची पचनक्रिया बिघडून जाते. अन्ननलिकेमध्ये तयार झालेल्या पित्तामुळे आंबट ढेकर येणे, घशात जळजळ वाढणे, डोकं दुखणे, उलट्या, मळमळ इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात.(फोटो सौजन्य – istock)
Health News: शरीरातील ही 5 लक्षणे ठरू शकतात घातक, दुर्लक्ष करण्याची चूक पडू शकते महागात
अन्ननलिकेत वाढलेल्या पित्ताचा परिणाम संपूर्ण शरीरावर लगेच दिसून येतो. त्यामुळे कोणतेही पदार्थ खाण्याची सुद्धा अजिबात इच्छा होत नाही. शरीरात साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे शरीराची पचनक्रिया पूर्णपणे बिघडून जाते. बद्धकोष्ठता किंवा अपचनाच्या समस्या उद्भवतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पित्त आणि ऍसिडिटीपासून सुटका मिळवण्यासाठी आल्याचे सेवन कशा पद्धतीने करावे? आल्याचे शरीराला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पद्धतीने आलं खाल्ल्यास शरीराची पचनक्रिया कायमच निरोगी राहील.
थंडीच्या दिवसांमध्ये आल्याचे मोठ्या प्रमाणावर सेवन केले जाते. आल्याच्या सेवनामुळे शरीरात उष्णता वाढते आणि आरोग्य सुधारते. जेवणाआधी आल्याचा बारीक तुकडा घेऊन त्यावर मीठ टाकून चघळावे. यामुळे तोंडात लाळ स्रवते आणि पोटात रस निर्माण होऊन भूक जास्त लागते. याशिवाय शरीरात वाढलेली ऍसिडिटी, पोट फुगणे, आंबट ढेकर येणे इत्यादी सर्वच समस्यांपासून सुटका मिळते. ऍसिडिटी वाढल्यानंतर गोळ्या औषधांचे सेवन करण्याऐवजी घरगुती उपाय करून आराम मिळवावा.यामुळे अपचनाचा त्रास होत नाही.
आल्यासोबत मीठ खाल्ल्यास शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स संतुलित राहतात आणि लघवीद्वारे होणारी मिठाची कमतरता भरून निघते. आल्याच्या सेवनामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात. याशिवाय रक्तभिसरण सुधारते आणि शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात. आलं आणि मीठ दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्यास शरीराला उष्णता मिळते आणि शरीराची ताकद वाढते. थंडीच्या दिवसांमध्ये साथीच्या आजारांची शरीराला मोठ्या प्रमाणावर लागण होते. अशावेळी आल्याचे सेवन करावे. आल्याचे सेवन केल्यामुळे सर्दी, खोकल्यापासून सुटका मिळते. त्यामुळे आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा आलं मिठाचे सेवन करावे. यामुळे पचनक्रिया निरोगी राहील.
पचन म्हणजे काय?
पचन ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, ज्यामध्ये अनेक अवयव एकत्र काम करतात. या प्रक्रियेद्वारे आपण खाल्लेल्या अन्नातून शरीराला आवश्यक असलेली पोषक तत्वे मिळतात.
सामान्य पचन समस्या आणि लक्षणे:
पोटात दुखणे, पोट फुगणे, अतिसार (जुलाब), बद्धकोष्ठता आणि छातीत जळजळ ही पचनसंस्थेच्या सामान्य समस्यांची लक्षणे आहेत. ही लक्षणे सौम्य असू शकतात, पण काहीवेळा ती गंभीर आरोग्य समस्या दर्शवू शकतात.
पचन सुधारण्यासाठी उपाय:
योगा, धावणे किंवा चालणे यांसारख्या व्यायामामुळे तुमची पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते. जास्त चरबीयुक्त आणि मसालेदार पदार्थ टाळावेत, कारण ते पचनक्रिया मंदावतात आणि त्रासदायक ठरू शकतात.






