फोटो सौजन्य: iStock
लिव्हर हा आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा आणि सक्रिय अवयवांपैकी एक आहे. पित्त तयार करणे, रक्त शुद्ध करणे अशा विविध कार्यात यकृताची भूमिका मोलाची आहे. तसेच पचन प्रक्रिया सुरळीत ठेवण्यापासून शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यापर्यंतच्या कामात सुद्धा लिव्हरची महत्वाची भूमिका असते. मात्र सध्याची धावपळीची लाइफस्टाइल, चुकीचा आहार आणि मद्यपानाच्या सवयीमुळे फॅटी लिव्हर, हिपॅटायटीस आणि सिरोसिससारखे गंभीर लिव्हरचे विकार मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत.
अनेक डॉक्टरांच्या मते, यकृताचे आजार ‘सायलेंट किलर’ असल्याचे म्हटले जाते. कारण त्याची सुरुवातीची लक्षणं सौम्य असतात आणि अनेकदा दुर्लक्षित देखील होतात. त्यामुळे वेळेत लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे.
घरच्या घरी बनवा हॉटेल सारखे टेस्टी आणि सॉफ्ट Chicken Seekh Kebab; चवीला मजेदार, विकेंडसाठी परफेक्ट
लिव्हर नीट कार्य करत नसेल तर शरीरात विषारी घटक साचतात. यामुळे काहीही न करता सतत थकवा जाणवतो, ऊर्जा कमी वाटते.
त्वचा आणि डोळे पिवळसर दिसणे हे लिव्हर बिघडण्याचं ठळक लक्षण आहे. यामागचं कारण म्हणजे बिलीरुबिन या घटकाचे शरीरात साचणे, जे लिव्हर नीट प्रोसेस करू शकत नाही.
पोटाच्या वरच्या उजव्या भागात दुखणे किंवा जडपणा वाटणे हे फॅटी लिव्हर किंवा हिपॅटायटीससारख्या स्थितीचे संकेत असू शकतात.
लिव्हर फेल होऊ लागल्यास विषारी घटक बाहेर टाकले जात नाहीत. यामुळे मळमळ, विशेषतः रात्रीच्या वेळी, तसेच उलट्या होऊ शकतात.
पित्तातील घटक वाढल्यामुळे त्वचेवर तीव्र खाज जाणवते. ही खाज सामान्यतः रात्री वाढते आणि ती पित्त सिरोसिस किंवा लिव्हरच्या नलिकेत अडथळा असल्याचे संकेत देऊ शकते.
Turmeric Water Benefits: पी हळद अन् हो गोरी….! हळदीचे पाणी प्या अन् शरीरात घडणारे चमत्कार पाहा
लिव्हर विकृत झाल्यास लघवीचा रंग गडद पिवळसर किंवा तपकिरी तर विष्ठेचा रंग फिकट किंवा गढूळ दिसतो. हे बिलीरुबिन असंतुलनामुळे होतं.
कोणत्याही कारणाशिवाय भूक मंदावणे, सतत वजन कमी होणे हे देखील लिव्हरच्या समस्येची शक्य चिन्हं आहेत.
ही सर्व लक्षणे दीर्घकाळ राहिल्यास किंवा ती तीव्र वाटू लागल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. लिव्हरच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास ते गंभीर आजारांचे कारण ठरू शकते.