लठ्ठपणा कमी करण्यासाठी आहारात 'या' पदार्थांचे सेवन करा
जगभरातील अनेक लोक लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त आहेत. लठ्ठपणा वाढल्यानंतर पोटावर अतिरिक्त चरबी वाढण्यास सुरुवात होते. तसेच लठ्ठपणा ही एक सामान्य समस्या असून जगभरातील अनेक लोक या समस्येपासून त्रस्त आहेत. अनेक लोक वजन वाढल्यानंतर आहारात बदल करतात. तर काही लोक दुपारी एकदाच जेवण करतात, संध्याकाळच्या वेळी जेवण करणे टाळतात. असे केल्यामुळे आरोग्य बिघडून जाते. तसेच चुकीच्या आहारात शैलीमुळे आरोग्यासंबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य तो डाईट फॉलो करून आहार घेणे गरजेचे आहे.
वजन वाढल्यानंतर हळूहळू शरीराच्या अवयवनांवर अतिरिक्त चरबी जमा होण्यास सुरुवात होते.शरीरातील अतिरिक्त चरबी जमा झाल्यानंतर मधुमेह, रक्तदाब, कोलेस्ट्रॉलची समस्या इत्यादी अनेक समस्या वाढू लागतात. या समस्या वाढू लागल्यानंतर आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करण्यासाठी आणि शरीरात वाढलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी आहारात कोणते पदार्थ खावेत, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
लठ्ठपणा कमी करण्यासाठी आहारात या पदार्थांचे सेवन करा:

लठ्ठपणा कमी करण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचे सेवन करा
वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात ब्राऊन राईसचे सेवन करावे. ब्राऊन राईसमध्ये फायबर, खजिने आणि जीवनसत्वे मुबलक प्रमाणात आढळून येतात. तसेच यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते. लठ्ठपणा कमी करण्यासाठी रोजच्या आहारात पांढरा रंगाचा तांदूळ खाण्याऐवजी ब्राऊन राईसचे सेवन करावे.

लठ्ठपणा कमी करण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचे सेवन करा
बाजरीमध्ये भरपूर पौष्टीक घटक आढळून येतात. तसेच इतर धान्यांच्या तुलनेत बाजरीमध्ये जीवनसत्वे बी, झिंक आणि मॅग्नेशिअम इत्यादी घटक आढळतात. त्यामुळे वाढलेले वजन कमी करण्यासाठी तुम्ही आहारात बाजरीच्या भाकरीचे किंवा बाजरीपासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करू शकतात.बाजरीची भाकरी खाल्ल्यामुळे पोटही भरेल आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल.

लठ्ठपणा कमी करण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचे सेवन करा
वजन कमी करण्यासाठी दलिया अतिशय गुणकारी आणि प्रभावी आहेत. संध्याकाळच्या वेळी इतर कोणतेही पदार्थ खाण्यावजी तुम्ही दलियांपासून बनवलेली खिचडी खाल्ली तर तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल. दलिया हा पदार्थ गव्हापासून बनवला जातो. तसेच यामध्ये 91 ग्रॅम दलियामध्ये 76 कॅलरीज आढळून येतात. दलिया खाल्ल्यानंतर पोटही भरते.






