बडीशेप खाल्याने आरोग्याला होणारे फायदे
काहीवेळा सतत तेलकट तिखट पदार्थ खाल्यामुळे अपचन किंवा गॅस होण्याची शक्यता असते. काहींना सतत बाहेरचे तळलेले किंवा तेलकट पदार्थ खाण्याची सवय असते. पण हे पदार्थ खाल्यामुळे आरोग्याला बिघडू शकते. यामुळे पोटासंबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. पोटासंबंधित समस्या उद्भवल्यानंतर डॉक्टरांकडून घेतलेल्या गोळ्या औषधांपेक्षा घरगुती उपाय अतिशय प्रभावी ठरतात. आयुर्वेदामध्ये पोटासंबंधित आजारांवर अनेक घरगुती उपाय सांगण्यात आले आहेत. काहींना जेवल्यानंतर किंवा इतर वेळी बडीशेप किंवा जिरं खाण्याची सवय असते. हे पदार्थ खाल्यामुळे जेवलेले अण्णा व्यवस्थित पचण्यास मदत होते. या बियांचे सेवन केल्यामुळे पचनसंबंधित समस्या उद्भवत नाहीत.
बडीशेपमध्ये अनेक गुणकारी घटक आढळून येतात. तसेच मॅग्नेशियम, झिंक, पोटॅशियम, सेलेनियम, विटामिन सी, विटामिन ई आणि विटामिन के, कॅल्शियम आणि लोहाचे प्रमाण जास्त असते. बडीशेप पचनक्रिया सुधारण्यासाठी अतिशय प्रभावी आहे. बडीशेपचे सेवन केल्यामुळे तेलकट किंवा तिखट पदार्थ खाल्यामुळे शरीरात होणारी जळजळ कमी होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला बडीशेप खाल्ल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: निरोगी फुफुस्स आणि धूम्रपान करणाऱ्यांचे फुफ्फुस? काय असतो फरक? जाणून घ्या
ॲसिडीटी होण्यामागे अनेक कारण आहेत. सतत तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे ॲसिडीटी वाढण्याची शक्यता असते. हे पदार्थ खाल्यामुळे पोटात अमल पित्त तयार होते. ज्यामुळे शरीरात जळजळ होणे, गॅस, अपचन इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. मटार, फ्लॉवर, भेंडी, वांग, कडधान्य यांसारख्या भाज्यांचे सेवन केल्यामुळे पोटात ॲसिडीटी निर्माण होते. तसेच तिखट किंवा तेलकट कोणतेही पदार्थ खाऊन दूध प्यायल्यास ॲसिडीटी वाढण्याची शक्यता असते.
बडीशेप, जिरं किंवा ओवा खाल्यामुळे शरीर निरोगी राहते. या बियांचे पाणी करून तुम्ही रिकाम्या पोटी पायस शकता. ज्यामुळे शरीरातील साचून राहिलेले विषारी पदार्थ बाहेर पडून जाण्यास मदत होईल. पण या बियांचे मर्यादित प्रमाणात सेवन करावे. कारण अतिप्रमाणात सेवन केल्यास आरोग्य बिघडू शकते. बडीशेपसह इतर बियांचे नियमित सेवन केल्यास आतड्यांच्या समस्या दूर होतात आणि आतड्या स्वच्छ राहण्यास मदत होते.
हे देखील वाचा: फळं की ज्यूस कशात असते जास्त शक्ती आणि न्यूट्रिएंट्स? जाणून घ्या
बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी बडीशेप बियांच्या पाण्याचे सेवन करावे. या बिया बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करतात. या बियांचे पाणी बनवण्यासाठी एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा बडीशेप पाण्यात टाकून रात्रभर भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी या पाण्याचे सेवन करा. यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल.