(फोटो सौजन्य: Pinterest)
दैनंदिन धावपळीत आपण अनेकदा वडिलांसोबत निवांत वेळ घालवू शकत नाही. या दिवशी त्यांच्यासोबत फिरायला जा, चहा घ्या किंवा मनमोकळ्या गप्पा मारा.
2. मनापासून आभार माना
वडिलांनी तुमच्यासाठी केलेल्या प्रत्येक त्यागाबद्दल त्यांचे आभार व्यक्त करा. काही प्रेमळ शब्दही त्यांना खूप आनंद देऊ शकतात.
3. पत्र द्या
मोबाईलच्या युगात हस्तलिखित पत्राचे महत्त्व वेगळेच आहे. तुमच्या भावना शब्दांत व्यक्त करून त्यांना एक सुंदर पत्र लिहा.
4. त्यांच्या आवडीचे जेवण बनवा
वडिलांच्या आवडीचा पदार्थ घरी बनवून त्यांना सरप्राइज द्या. हा छोटासा प्रयत्नही त्यांचा दिवस खास बनवू शकतो.
5. जुन्या आठवणींना उजाळा द्या
कुटुंबातील जुने फोटो किंवा व्हिडिओ पाहा आणि त्या आठवणी पुन्हा जगा. यामुळे भावनिक नाते अधिक घट्ट होते.
6. एक छोटा प्रवास आखा
जवळच्या एखाद्या ठिकाणी कुटुंबासोबत छोटा फेरफटका किंवा पिकनिक आयोजित करा आणि वडिलांसोबत मोकळा वेळ घालवा.
7. त्यांच्या छंदांना प्रोत्साहन द्या
वाचन, बागकाम, संगीत किंवा खेळ यापैकी जे काही त्यांना आवडते त्यासाठी वेळ आणि साधने उपलब्ध करून द्या.
8. आवडती भेटवस्तू द्या
त्यांच्या गरजेनुसार किंवा आवडीनुसार एखादी उपयुक्त भेटवस्तू निवडा. ती महागडी असण्याची गरज नाही.
जोडीदाराच्या आयुष्यात पहिलं स्थान हवंय? मग नात्यात करू नका ‘या’ 3 चुका
9. सोशल मीडियावर खास संदेश शेअर करा
वडिलांसोबतचा एखादा फोटो पोस्ट करून त्यांच्याविषयीच्या भावना व्यक्त करा. शब्दा्ंनी व्यक्त न करता येणाऱ्या भावना तुम्ही फोटोच्या कॅप्शनमध्ये व्यक्त करु शकता.
10. त्यांचे ऐका
अनेकदा वडिलांनाही कोणीतरी शांतपणे ऐकणारी व्यक्ती हवी असते. त्यांच्या अनुभवांना आणि विचारांना वेळ द्या.






