“प्रेम म्हणजे प्रेम असतं आणि तुमचं आमचं अगदी सेम असतं”, असं मंगेश पाडगावकर यांची कविता प्रसिद्ध आहे. प्रेमाची भावना सारखी असली तरी ते व्यक्त करणं आणि निभावणं हे वेगवेगळं असतं. अनेकजण प्रेम व्यक्त करतात आणि नकार आला की खचून जातात किंवा मूव्ह ऑन होतात. आलेला नकार कसा पचवायचा हे ज्याच्या त्याच्या आयुष्यावर आणि विचारांवर अवलंबून असतं. असं म्हणतात की प्रेम संयम शिकवतं आणि खरं प्रेम मिळतंच मिळतं. याची जाणीव करुन देतं ते ल्यूक आणि साराची लव्हस्टोरी.
युकेमधील ल्यूक विन्ट्रिप आणि त्याची प्रेयसी सारा यांच्या प्रेमाची आणि त्यांची ही आगळी वेगळी स्टोरी पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. ल्यूकने साराला सर्वात पहिले 2018 मध्ये प्रपोज केलं त्यावेळी साराने ल्यूकला नकारह दिला. सारा म्हणाली की, तू माझा खूप चांगला मित्र आहेस आणि त्यापलिकडे मी तुला पाहत नाही. आपण आपली मैत्री अशीच कायम ठेऊयात असं साराने ल्यूकला सांगितलं. साराच्या या नाकारानंतर ल्य़ूकने हार मानली नाही. 2018 पासून ते 2025 पर्यंत ल्यूकने साराला 7 वर्षात तब्बल 42 वेळा प्रपोज केलं. विशेष म्हणजे 42 वेळा प्रपोज करुनही सारा नकार दिला आणि तरीही ल्यूकने हार मानली नाही. अखेर जेव्हा 43 व्या वेळी ल्यूकने पुन्हा नव्य़ाने सारावरच्य़ा प्रेमाची कबूली दिली त्यावेळी साराने ल्यूकच्या प्रेमाचा स्वीकार केला. .या लव्ह स्टोरीची चर्चा सोशलमीडियावक वाऱ्यासारखी पसरली आणि नेटकऱ्यांनी या जोडप्याचं विशेषत: ल्यूकचं अभिनंदन आणि कौतुक केलं आहे.
ल्यूक हा व्यवसायाने टॅट्यू आर्टीस्ट आहे तर सारा मार्केटींग एक्झिक्युटिव्ह. 2018 साली जेव्हा ल्यूकने साराला मागणी घातली त्यावेळी त्यांच्या मैत्रीला केवळ 6 महिने झाले होते. मात्र त्यावेळी सारा तिच्या आधीच्या नात्यातून नुकतीच बाहेर पडत होती. तिला तिचा वाईट भूतकाळातून बाहेर पडायचं होतं. त्याचबरोबर सारावर तिच्या मुलाची जबाबदारी देखील होती म्हणून सारा ल्यूकला नकार देत होती. तिला आयुष्याचा एवढा मोठा निर्णय घाईघाईत घ्यायचा नव्हता. मात्र हार मानेल तो ल्यूक कसला ? त्याने 7 वर्ष 42 वेळा प्रपोज केल्यावर साराने ल्यूकच्या प्रेमाचा स्वीकार केला. याबाबत साराने सांगितलं की, ल्यूकचं दरवेळी प्रपोजल खूप वेगळं असायचं. ल्यूकने माझ्यावक कधीच कसलीही जबरदस्ती केली नाही. तो प्रत्येक वेळी प्रपोज करताना मनाने खूप निर्मळ असयचा. ज्यावेळी ल्यूकने 42 व्या वेळी नकार दिला त्यावेळी साराने त्याला सांगितलं की पुढच्या वेळी मी तुला नक्की होकार देईल. त्यानंतर ल्यूकने लंडनच्या ग्रीनविचवर गुडघ्य़ावर बसून साराला प्रपोज केलं आणि तिने ल्यूकला होकार दिला. प्रेम खरं असेल तर ते तुमच्याकडे येतं गरज असते ती संयम बाळगण्य़ाची हेच ल्यूक आणि साराची लव्हस्टोरी सांगते.