भारताचा स्वातंत्र्यदिन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या दिवसाची जंगल तयारी अखेर सुरु झाली आहे. या दिनानिमित्त देशभर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच एकमेकांना शुभेच्छा देत हा दिवस उत्साहात साजरा केला जातो. 15 ऑगस्ट हा दिवस भारतात स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जातो, याच दिवशी भारताची ब्रिटीशांच्या तावडीतून सुटका झाली होती. हा दिवस भारतीय इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस म्हणून ओळखला जातो.
या खास दिनानिमित्त तुम्हीही काही नवीन आणि हटके करायला विचार करत असाल, तर आजची ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे. आज आम्ही तुमच्यासोबत या खास दिनानिमित्त एक युनिक आणि चविष्ट अशी ‘तिरंगा डोसा’ या पदार्थाची रेसिपी शेअर करत आहोत. ही रेसिपी हटके असण्याचे कारण म्हणजे यात आपण भारतीय ध्वजातील रंगाचा वापर करून याला बनवणार आहोत.
मुख्य म्हणजे हे रंग आपण नैसगिरक पद्धतीने तयार करणार आहोत. भारतीय ध्वजाप्रमाणे दिसणार हा डोसा चवीलाही अप्रतीम लागतो. या रेसिपीने तुम्ही घरच्या सदस्याने मन जिंकू शकता. या रेसिपीचा व्हिडिओ @Niti’s Cooking नावाच्या युट्युब चॅनेलवर शेअर करण्यात आला आहे. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – lndependence Day 2024: यावर्षीचा स्वातंत्र्यदिन हटक्या पद्धतीने साजरा करा, घरी बनवा तिरंगा बर्फी