(फोटो सौजन्य: Instagram)
व्हिडिओत काय घडलं?
तुम्ही सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील ज्यात लोक उंच पर्वतावरून त्यांच्या गाड्या खाली उतरवताना दिसतात, पण तुम्ही कधी डोंगरावर गाडी चालवत नेताना पाहिलं आहे का? असं करण आपल्या जीवासाठी धोकादायक असलं तरी एका चालकाने हे सत्यात करुन दाखवलं आहे. व्हिडिओमध्ये आपल्याला एक गाडी उंच टेकडीवरून वर जाताना दिसते आणि हळूहळू डोंगराच्या माथ्यावर सुरक्षितपणे पोहोचते. डोंगऱ्यासारख्या खळकाळ पर्वतावर त्याने चारचाकी कशी शेवटपर्यंत चालवली असा प्रश्न अजूनही यूजर्सच्या मनात घोंगावत आहे. चालकाच्या साहसाचे काैतुक करण्यासारखे असले तरी हे देखील लक्षात घेतले पाहिजे की हा स्टंट साहस दर्शवत असला तरी आपल्या जीवासाठी ते अत्यंत धोकादाय ठरु शकते.
दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ @rockcrawldaily नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘मी हे पहिल्यांदाच पहिले आहे’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हा माणूस परत खाली कसा उतरणार आहे?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कोणती कार आहे ही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मला हे खरं वाटतं नाही, हे AI असावं”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






