जेवणाची रंगत वाढवण्याची अनेकजण आपल्या जेवणात चटणी, लोणचं, पापड अशा साइड डिशेसचा समावेश करत असतात. याच्या मदतीने नावडती भाजी असली तरी दोन घास जेवण जास्तच जातं. आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक झणझणीत आणि चविष्ट चटणीची रेसिपी घेऊन आलो आहोत. चपाती असो वा भात चटणी तुम्ही कोणत्या पदार्थासोबत खाऊ शकता.
तुम्हालाही मसालेदार आणि तिखट पदार्थ खायला फार आवडत असले तर आजची ही रेसिपी तुमच्या फायद्याची ठरणार आहे. आज आम्ही तुम्हाला लसूण, खोबरे आणि लाल मिरचीची कोरडी चटणी कशी तयार करायची याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत. ही चटणी फार कमी वेळेत आणि कमी साहित्यापासून तयार होते. तसेच या चटणीची चवही फार अप्रतिम लागते. हिची चव चाखताच घरातील सर्व बोट चाटत राहतील. ही चटणी तुम्ही अनेक दिवस साठवून देखील ठेवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – ‘क्रिस्पी पकोडा रोल्स बॉल्स’ कधी खाल्ले आहे का? व्हायरल रेसिपीतून जाणून घ्या बनवण्याची योग्य पद्धत







