सौजन्य: istock
पावसाळा सुरु झाला की आपल्याला विविध पदार्थ खाण्याचे क्रेविंग्स सुरु होतात. पावसाळी वातावरणात चटपटीत असे काहीतरी खाऊ वाटते. पण तेच पदार्थ मसालेदार असल्यामुळे पित्ताचा त्रास देखील होऊ शकतो. त्यामुळे अशा मसालेदार पदार्थांचा प्रभाव कमी करण्यासाठी असं काहीतरी खायाला हवं जे पोटाला थंडावा देईल. त्यामुळे अशा पदार्थांसोबत रायता खाऊन पोटाला होणाऱ्या त्रासापासून वाचवता येते. भारताच्या पारंपरिक संस्कृतीही रायत्याला विशेष महत्त्व दिले गेले आहे. अगदी खूप जुन्या काळापासून हा पदार्थ बनवला जातो. सर्वचजण तो आनंद घेत खातात. भात, पराठा किंवा पुरी यांसारख्या इतर भारतीय पदार्थांसोबत ही साइड डिश खाल्ली जाते. असे म्हणता की रायता खाल्ल्याशिवाय जेवणाला चव येत नाही. रायत्याला इंग्रजीमध्ये मिक्स कर्ड म्हणतात. कारण दह्यामध्ये बऱ्याच गोष्टी टाकून हा पदार्थ बनवला जातो.
जेवणासोबत रायता खायला बऱ्याच जणांना फार आवडते. जेवण जर मसालेदार असेल तर त्यासोबत रायता हा बनवलाच जातो. रायता हा भारतीय पदार्थ आहे जो दही किंवा ताकापासून बनवला जातो ही एक अशी साईड डिश आहे जी सर्वजण आवडीने खातात. हा पदार्थ पोटाला थंडावा देणारा आहे. यामध्ये विविध फ्लेवर्स देखील तयार करता येतात. रायता हा एक अतिशय आरोग्यदायी पदार्थ मानला जातो कारण त्यात दही भरपूर प्रमाणात प्रोबायोटिक्सही असतात. यामुळे पचनक्रिया चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते. याशिवाय रायता हा प्रथिने, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बी 12 सारख्या विविध पोषक तत्वांचा म्हह्त्वाचं स्रोत आहे. भारतीय खाद्यपदार्थाच्या संस्कृतीत, विशेषतः उत्तर भारतीय राज्यांमध्ये रायता हा पदार्थ जास्त खाल्ला जातो. याशिवाय रायता फळे आणि भाज्यांसोबतही दिला जातो, ज्यामुळे त्याची चव आणि पौष्टिक मूल्य आणि विविधता वाढते.
कसे पडले रायता हे नाव ?
बंगाली आणि हिंदी भाषेमध्ये “रैता” हा एक पाककलेतील शब्द आहे. ज्याचे मूळ हे प्राचीन भाषांमध्ये आणि विशेषतः संस्कृतमध्ये आहे. “राजिका” किंवा त्याचा हिंदी भाषेतील शब्द “राय” म्हणजे काळी मोहरी असे म्हणतात. या शब्दांपासून रायता या शब्दाची उत्पत्ती झाली आहे.
रायता ही भारतीय पाककृती कच्च्या किंवा शिजवलेल्या भाज्या, फळे यापासून बनवला जातो. तसेच बूंदी रायता हा बेसनपासून बनवलेली बुंदी घालून दह्यापासून बनवलेली एक साइड डिश आहे. पाश्चात्य पाककृतीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साइड डिश किंवा डिप किंवा शिजवलेले सॅलड.
मुख्य साहित्य: ताक, काकडी
मूळ: भारत
मूळ ठिकाण: भारत, पाकिस्तान, बांगलादेश
अन्न ऊर्जा (प्रति सर्व्हिंग): 46 kcal (193 kJ)
पर्यायी नावे: रायता, রায়তা; पचडी
संबद्ध पाककृती: भारत, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ