दरवर्षी १० फेब्रुवारीला जागतिक कडधान्य दिन (World Pulses Day) साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना डाळींचं महत्त्व पटवून देणं आणि पोषण (Nutrition) आणि अन्नसुरक्षेसाठी कडधान्ये किती महत्त्वाची आहेत, हे सांगणं हा (World Pulses Day 2022) आहे. जागतिक कडधान्य दिन साजरा करण्यामागचा इतिहास (History Of World Pulses Day) आपण जाणून घेऊयात.
[read_also content=”जाँटी प्लस इलेक्ट्रिक स्कूटर लवकरच बाजारात येणार, स्कूटरची १२० किमीची रेंज, ग्राहकांचे मोठ्या प्रमाणात बुकिंग https://www.navarashtra.com/mumbai/kokan/mumbai/jonty-plus-sctoor-launch-early-in-market-booking-start-235637.html”]
‘जागतिक कडधान्य दिन’ पहिल्यांदा २०१६ मध्ये साजरा करण्यात आला, नंतर संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने १० फेब्रुवारी हा जागतिक कडधान्य दिन म्हणून साजरा करण्याचा ठराव मंजूर केला. तेव्हापासून हा दिवस ‘जागतिक कडधान्य दिन’ म्हणून साजरा केला जातो.
वर्ष २०२२ साठी ‘जागतिक कडधान्य दिन’ ची थीम ‘शाश्वत कृषी अन्न प्रणाली साध्य करण्यासाठी तरुणांना सक्षम करण्यासाठी कडधान्यं’ (Pulses to empower youth in achieving sustainable agrifood systems) अशी ठरवण्यात आली आहे. या दिवशी आयोजित करण्यात येणारे कार्यक्रम आणि परिसंवाद या विषयावर भर दिला जाणार आहे.
आजच्या जीवनशैलीत लोक फास्ट फूड आणि फ्रोझन फूडला जास्त महत्त्व देत आहेत. त्यामुळं आपल्या आहारात डाळींचा वापर कमी होत आहे. त्यामुळं शरीराला पूर्ण पोषण मिळत नसून त्याचे दुष्परिणाम लोकांच्या विशेषत: लहान मुलं व तरुणांच्या आरोग्यावर होत आहेत. लोकांच्या आरोग्यासाठी आणि अन्नसुरक्षेसाठी डाळी किती महत्त्वाच्या आहेत, ही बाब लोकांपर्यंत पोहोचावी आणि डाळींचा आहारात समावेश करण्यासाठी जनजागृती व्हावी, या उद्देशाने जागतिक कडधान्य दिन साजरा केला जातो. द्विदल धान्यांना म्हणजेच ज्या धान्यांपासून डाळी तयार होतात, त्यांना कडधान्यं म्हणतात. मूग, उडीद, तूर, हरभरा, मसूर, राजमा, वाटाणा, कुळिथ यांसारख्या अनेक प्रकारच्या कडधान्यांचं उत्पादन भारतात घेतलं जातं. हे प्रथिनांचे मुख्य स्त्रोत आहेत.