Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fridge Storage Tips: प्रत्येक वस्तू फ्रिजमध्ये ठेवताय? चुकूनही ठेवू नका ‘या’ गोष्टी; नाहीतर होईल नुकसान

Food Storage Tips: काहींना प्रत्येक वस्तू फ्रिजमध्ये ठेवायची सवय असते, परंतु यामुळे काही पदार्थ सडतात तर काहींची चव बिघडते. यासाठी, कोणते पदार्थ फ्रिजमध्ये ठेवू नये, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 12, 2026 | 08:47 PM
Fridge Storage Tips: प्रत्येक वस्तू फ्रिजमध्ये ठेवताय? चुकूनही ठेवू नका ‘या’ गोष्टी; नाहीतर होईल नुकसान
Follow Us
Follow Us:
  • प्रत्येक वस्तू फ्रिजमध्ये ठेवताय?
  • ठेवू नका ‘या’ गोष्टी
  • नाहीतर होईल नुकसान
घरात भाजीपाला, फळे किंवा इतर खाद्यपदार्थ आणल्यानंतर ते थेट फ्रिजमध्ये ठेवणे ही अनेकांची सवय असते. विशेषतः उन्हाळ्यात तर फ्रिजशिवाय अन्न टिकणारच नाही, असे अनेकांना वाटते. मात्र प्रत्येक पदार्थाला थंड वातावरण मानवतेच असे नाही. काही पदार्थ फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यांची चव कमी होते, पोत बदलतो आणि पोषणमूल्यांवरही परिणाम होतो. अनेकदा अन्न जास्त दिवस टिकवण्याच्या प्रयत्नात आपण नकळत ते लवकर खराब होण्यास कारणीभूत ठरतो. त्यामुळे कोणते पदार्थ फ्रिजमध्ये ठेवावेत आणि कोणते टाळावेत, हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Oral Health: अनेक दिवसांपासून एकच टूथब्रश वापरता? आरोग्यासाठी ठरू शकतो धोकादायक; जाणून घ्या बदलण्याची योग्य वेळ

हे पदार्थ फ्रिजमध्ये ठेवणे टाळा

टोमॅटो

टोमॅटो थंड तापमानात ठेवल्यास त्यांची नैसर्गिक चव कमी होते. त्यांचा गर मऊ पडतो आणि स्वयंपाकातील ताजेपणाही कमी होतो. सॅलड किंवा भाजीसाठी वापरताना अशा टोमॅटोमध्ये अपेक्षित रसाळपणा आणि स्वाद जाणवत नाही.

बटाटे

फ्रिजमधील थंडीमुळे बटाट्यातील स्टार्च साखरेत रूपांतरित होतो. त्यामुळे त्यांची चव बदलते आणि शिजवल्यानंतर रंगही वेगळा दिसू शकतो. यामुळे बटाट्यापासून बनवलेले पदार्थ चविष्ट लागत नाहीत.

कांदा आणि लसूण

कांदा व लसूण फ्रिजमधील ओलावा शोषून घेतात. त्यामुळे ते मऊ पडण्यासोबतच त्यावर बुरशी येण्याचा धोका वाढतो. हवेशीर जागेत ठेवल्यास त्यांची गुणवत्ता आणि ताजेपणा अधिक काळ टिकून राहतो.

केळी

केळी फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यांची साल लवकर काळी पडते आणि नैसर्गिक पिकण्याची प्रक्रिया मंदावते.

ब्रेड

ब्रेड फ्रिजमध्ये ठेवल्याने ती कोरडी पडते आणि तिचा मऊपणा निघून जातो. त्यामुळे ती लवकर शिळी झाल्यासारखी वाटते. यामुळे सँडविच किंवा टोस्ट बनवताना ब्रेड कडक होऊन खराब झाल्याचा वास येतो.

मध आणि कॉफी

मध थंड वातावरणात घट्ट होऊ शकतो, तर कॉफी फ्रिजमधील इतर पदार्थांचा वास शोषून घेते, ज्यामुळे तिची चव आणि सुगंध कमी होतो.

या पद्धतीने करा स्टोअर

फ्रिज अन्न सुरक्षित ठेवण्यासाठी उपयुक्त असला तरी प्रत्येक पदार्थासाठी तो योग्य पर्याय नसतो. अन्न अधिक काळ ताजे ठेवण्यासाठी केवळ फ्रिजवर अवलंबून राहू नका. प्रत्येक पदार्थाच्या गरजेनुसार त्याची साठवणूक केल्यास चव, गुणवत्ता आणि पोषणमूल्य अधिक काळ टिकून राहतात. त्यामुळे पुढच्या वेळी कोणतीही वस्तू फ्रिजमध्ये ठेवण्यापूर्वी ती खरोखरच तिथे ठेवण्याची गरज आहे का, याचा विचार करा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

तंबाखूचे धोके माहिती तरीही 10 पैकी 9 जण करतात सेवन, सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर

Web Title: Fridge storage tips foods you should not keep in refrigerator

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 08:47 PM

Topics:  

  • Food Safety
  • Health Care Tips
  • Healthy Foods

संबंधित बातम्या

Fever Care Tips: ताप आल्यावर अंघोळ करणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
1

Fever Care Tips: ताप आल्यावर अंघोळ करणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Health Tips: दररोज तूप खाताय? ‘या’ चुका टाळा, नाहीतर फायद्याऐवजी होऊ शकते नुकसान
2

Health Tips: दररोज तूप खाताय? ‘या’ चुका टाळा, नाहीतर फायद्याऐवजी होऊ शकते नुकसान

तरुणींमध्ये वाढतेय स्तनातील गाठींचे प्रमाण! तज्ज्ञांच्या सल्ल्याने वेळीच करा उपचार, अन्यथा उद्भवेल गंभीर आजारांचा धोका
3

तरुणींमध्ये वाढतेय स्तनातील गाठींचे प्रमाण! तज्ज्ञांच्या सल्ल्याने वेळीच करा उपचार, अन्यथा उद्भवेल गंभीर आजारांचा धोका

चमकदार त्वचेसाठी आजपासूनच प्या ‘हे’ नॅचरल ज्यूस, सुरकुत्या कमी होण्यासोबतच चेहऱ्यावर येईल गोल्डन ग्लो
4

चमकदार त्वचेसाठी आजपासूनच प्या ‘हे’ नॅचरल ज्यूस, सुरकुत्या कमी होण्यासोबतच चेहऱ्यावर येईल गोल्डन ग्लो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.