आता अष्टविनायकाचा महिमा गिरगावात अनुभवता येणार
गणेशोत्सव म्हंटलं की महाराष्ट्रात सगळीकडे जल्लोषाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळते. त्यातही मुंबईतील गणेशोत्सवाची बातच न्यारी. मुंबईतील प्रत्येक शहर गणरायाच्या आगमनाने उजळून जाते. तसेच गणेशोत्सवाच्या निमित्ताने ठिकठिकाणी विविध विषयांवरील देखावे केले जातात, जे पाहण्यासाठी मुंबईकर गर्दी करत असतात.
मुंबईतील गिरगावात सुद्धा मोठ्या उत्सहात आणि आनंदात गणेशोत्सव साजरा केला जातो. खरंतर, गिरगावात नेहमीच मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन होत असते. मुंबईतील पहिला गणेशोत्सव सुद्धा गिरगावातील केशवजी नाईक चाळीत लोकमान्य टिळकांच्या मार्गदर्शनाखील सुरु झाला. यंदा गिरगावातील अनेक मंडळांनी विविध देखावे बनवले आहे.
Ganesh Chaturthi: गणपतीच्या दिवसात घराची शोभा वाढवतील बेडशीट्स, Home Decor साठी अशी करा निवड
यंदा गिरगावातील 86 मंडळ ‘अष्टविनायक वारी’ या खास उपक्रमानिम्मित एकत्र आले आहे. यामुळे गिरगावचा गणेशोत्सव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तसेच यंदा या शहरातील 8 मंडळांनी अष्टविनायक मंदिरांची प्रतिकृती उभारली आहे. कला दिग्दर्शक सुमित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मंदिरं उभारण्यात आली आहेत. यामुळे भाविकांना गिरगावातच अष्टविनायकाचे दर्शन घडणार आहे. चला जाणून घेऊयात, कोणत्या मंडळाने अष्टविनायकातील कोणते मंदिरं उभारले आहे.
वाटीभर पनीरपासून १० मिनिटांमध्ये झटपट बनवा रसमलाई मोदक! नोट करून घ्या मोदक बनवण्याची सोपी रेसिपी
या अष्टविनायकाच्या वारीनिम्मित मुंबईकरांना अष्टविनायकांचे दर्शन खूप सोप्या पद्धतीने होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही सुद्धा गिरगावातील गणेशोत्सव पाहण्यासाठी येणार असाल तर मग या मंडळांना नक्की भेट द्या.